21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeलातूरपाटोदा येथे आढळले एकाच दिवशी पंधरा कोरोना रुग्ण

पाटोदा येथे आढळले एकाच दिवशी पंधरा कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील पाटोदा येथील एकाच दिवशी पंधरा रुग्ण कोरोना आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. जळकोट शहरामधील दोन कोरोना रुग्णांचा दोन दिवसात मृत्यू झाला आहे.

जळकोट तालुक्यात आता १८२ कोरुना रुग्णांची संख्या झाली आहे. तालुक्यात दि ४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १९ रुग्ण आढळले आहेत यात पाटोदा १५ ,जळकोट २, उमरदरा २ या गावांचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत १०१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे तरह्यालुक्­यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एक्टिवेशन संख्या ७५ आहे तर होम आयसोलेशन मध्ये हे अठरा रुग्ण उपचार घेत आहेत तर पंचवीस कोरोना रुग्णांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तालुक्­यातील जनतेनी काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक जगदीश सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार, डॉक्टर सचिन सिद्धेश्वरे यांनी केले आहे.

संस्कारक्षम पिढी घडवणारा शिल्पकार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या