27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यातील पंधरा हजार शेतक-यांनी भरला सव्वा कोटींचा पीक विमा

जळकोट तालुक्यातील पंधरा हजार शेतक-यांनी भरला सव्वा कोटींचा पीक विमा

एकमत ऑनलाईन

जळकोट : लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने यावर्षी शेतक-यांना गैरसोय होऊ नये म्हणून गावातच सोसायटीच्या वतीने पिक विमा भरून घेण्याची सोय केली होती. याचा फायदा शेतक-यांना झाला असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये पीक विमा चा भरणा अधिक झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन शाखांमध्ये १४८६५ शेतक-यांनी एक कोटी १६ लक्ष ८३ हजार रुपयांचा पीक विमा भरला आहे.

जळकोट तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आतनूर शाखेत दोन हजार ६७३ शेतक-यांनी वीस लाख छत्तीस हजार रुपयाचा पिक विमा, जळकोट येथील शाखेत सहा हजार ६४२ शेतक-यांनी ४९ लाख ७३ हजार रुपये, तर वांजरवाडा येथील शाखेत ५५४७ शेतक-यांनी शेचाळीस लाख ७८ हजार रुपयाचा पिक विमा भरला आहे.

हा पिक विमा भरून घेण्यासाठी विविध शाखेचे शाखाधिकारी, फिल्ड आॅफिसर , जळकोट तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, तसेच गटसचिव यांनी प्रयत्न केले ३१ जुलै ही शेवटची तारीख होती, आता आणखी चार ते पाच दिवस मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे

खरीप पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी
शिरूर अनंतपाळ : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत जनजीवन ठप्प झाल्याने कागदपत्राअभावी अनेक शेतक-याना पंतप्रधान खरीप पीक विमा भरण्यासाठी अडचणी आल्याने अनेक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहणार असल्याने पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतक-यांतून केली जात आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता ३१ जूलै पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे.

कडक लॉकडाऊन असल्याने अनेक शेतक-याना घराबाहेर पडता आले नाही. त्यात गेल्या मंगळवारपासून बँकाचा व्यवहार बंद असून जवळ पैसे नसल्याने खरीप हंगामाच्या पिकांचा पीक विमा भरण्यासाठी शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे पीक विम्यापासून एक ही शेतकरी वंचित राहू नये यासाठी खरीप पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी होत आहे. सतत दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतक-यावर यंदा बोगस बियाणांमुळे दुबार -तिबार पेरणीचे संकट आले.

त्यात गेल्या चार महिन्यापासूनच्या लॉकडाऊनमुळे व दुबार-तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या मोठा पाऊस पडला नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.दरम्यान पीक विमा भरण्यासाठी कागदपत्रासह पैशांची जुळवाजुळव करताना शेतक-यांची दमछाक झाली आहे.

स्टॅम्पपेपरची अट शिथील करावी
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे शेतकरी घराबाहेर निघत नाहीत. एकत्रित सातबारा असणा-या शेतक-याना विमा अर्जासह स्टॅम्पपेपरची अट, मंगळवारपासून बंद असलेल्या बँका यामुळे खरीप पीक विमा भरण्यापासून व शेतकरी वंचित राहणार असल्याने स्टॅम्पपेपरची अट शिथील करून पीक विमा भरण्याची मुदत वाढवून द्यावी.
-शिवाजी पेठे शेतकरी नेते, शिरूर अनंतपाळ

Read More  कोरोनाचा उद्रेक : १५४ नवे रूग्ण,तिघांचा मृत्यु

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या