26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeलातूरलालमिरचीच्या दरात पन्नास टक्क्यांची वाढ

लालमिरचीच्या दरात पन्नास टक्क्यांची वाढ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
उन्हाचा कडाका वाढल्यापासून घरगुती तिखट तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी केली जाते. परंतु यंदाच्या कमी आवक असल्याने लाल मिरचीचा चांगला तोरा वाढल्याचे चित्र आहे. यंदा लालमिरचीचे दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत आहे. तसेच, लवंगी मिरचीचे भाव ब-यापैकी स्थिर आहेत.

वर्षभर पुरेल इतके लाल तिखट, मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी वाढली आहे. लाल मिरची प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी भागातून येत असल्याचे विक्रेते प्रदिप स्वामी यांनी सांगितले. खास लवंगी मिरची आवक सिल्लोड, बुलढाणा आदी भागातून होते, परंतु यंदा आवक कमी असून प्रामुख्याने आंध्रप्रदेश अन्य भागातून माल आल्याचे त्यांनी सांगितले.

जानेवारीपासून लाल मिरचीची आवक बाजारात सुरु झाली आहे. यात बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, काश्मिरी, संकेश्वरीसह मागणी असलेली तिखट लवंगी मिरची बाजारात उपलब्ध झाली आहे. शहर परिसरातील विविध मिरची विक्री केंद्र, किराणा दुकाने आदी ठिकाणी लाल मिरची खरेदीसाठी ग्राहकांची चांगली रेलचेल वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आवक कमी असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेते लाल मिरचीचे भाव ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दरवाढीमुळे ग्राहकांना लाल मिरचीचा ठसका बसू लागला आहे. तर मागणी यापेक्षा वाढल्यास भाव तेजीत येतील, अशी शक्यताही प्रदिप स्वामी विक्रेत्यांनी व्यक्त केले. तसेच, गुटूर डिलक्स मिरची ४०० ते ४२० रुपये, लवगी मिरची २०० ते २५० रुपये, बेंडगी ३८० ते ४५० रुपये, चपटा ३०० ते ३५० रुपये, तेजा २३० ते ३०० रुपये, काश्मिरी ३८० ते ४२० रुपये, संखेशेरी ४०० ते ४५० रुपये, प्रति किलो दराने विकली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या