लातूर : प्रतिनिधी
मांजरा साखर परिवारातील बेलकुंड तालुका औसा येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर साखर कारखान्याच्या चालू २०२१- २२ हंगामात गाळप झालेल्या उसपुरवठाधारक शेतक-यांना अंतीम भाव एफआरपी सहीत २ हजार ३२३ रुपये देण्यात आला असून राज्याचे माजी मंत्री मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या मारुती महाराज साखर कारखान्याने यापूर्वीच पहिला हप्ता २ हजार २०० रुपये दुसरा हप्ता १०० रुपये दिला असून तिस-या हप्त्याची रक्कम २३ रुपया प्रमाणे ४९ लाख रुपये उस उत्पादक शेतक-यांना त्यांच्या खात्यावर अदा केले आहेत अशी माहिती संत श्री शिरोमनी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शामराव भोसले, सरव्यवस्थापक दत्ता श्ािंदे यांनी दिली.
औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत मारुती महाराज साखर कारखान्याचे संपुर्ण गाळप होइल का नाही याबाबत चर्चा होत्या. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यातील उस उत्पादक शेतक-यांना जो शब्द दिला होता, तो तंतोतंत पालन करून सर्व सभासद यांच्या उसाचे गाळप करत या साखर कारखान्याने प्रथमच क्षमतेपेक्षा अधिक वेगाने गाळप केले. चालू हंगामात २ लाख ८ हजार ९५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून २ लाख १७ हजार १२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. त्यातून आज रोजी गाळप हंगामात उस उत्पादक शेतक-यांना ४८ कोटी ५३ लाख ९७ हजार रुपये अदा केले आहेत. सात वर्षांपासून बंद असलेल्या साखर कारखान्याने प्रथमच गाळप करून औसा तालुक्यातील शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या आधार देण्याचे काम मांजरा साखर परिवाराने केले आहे हे विशेष आहे.
‘मारुती’ कारखान्यामुळे बाजार फुलला -औसा तालुक्यातील मारुती महाराज साखर कारखाना गेली ७ वर्ष बंद होता. त्यानंतर निवडणूक झाली. त्यात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल निवडून आले. त्यांनी कारखाना सुरू करण्याचा शब्द दिला होता. तो पाळून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा साखर परिवाराने गाळप सुरू केल.े यावर्षी प्रथमच सुरू झालेल्या साखर कारखान्यामुळे आर्थिक मदत मिळाल्याने उस उत्पादक शेतक-यांना आर्थिक मदत मिळाली असून परिसरातील बेलकुंड, उजनी, आशिव, मातोळा या भागातील छोटे उद्योग, व्यापारी, दुकानदार यांची बाजारपेठ फुलली असून हे केवळ मारुती महाराज साखर कारखाना सुरू झाल्याने शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया येथील व्यापा-यांनी बोलताना सांगितले.