27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरअखेर रेणापूर-लातूर महामार्ग झाला खुला

अखेर रेणापूर-लातूर महामार्ग झाला खुला

धिरज देशमुख यांचा पाठपुरावा; विद्युत मनोऱ्याची उंची वाढल्याने वाहतूक सुरळीत

एकमत ऑनलाईन

लातूर : रेणापूर-पिंपळफाटा-लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरील उच्च दाब विद्युत मनोऱ्याची उंची वाढवण्यासाठी आमदार मा. धिरज विलासराव देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे मनोऱ्याची उंची अखेर वाढवण्यात आली असून मुख्य रस्ता आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

राष्ट्रीय महामार्ग 548 बी रस्त्यावरील रेणापूर येथील रेणापूर फाट्याजवळ उच्च दाब विद्युत मनोऱ्याची उंची न वाढल्यामुळे हा महामार्ग वाहनचालकांसाठी आणि प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. बरेच अपघातही या ठिकाणी झाले. विद्युतवाहिन्या उंचावर नसल्याने वाहने या रस्त्यावरून मार्गस्थ होत नव्हती. या घटनांची तातडीने दखल घेऊन आमदार मा. धिरज विलासराव देशमुख मनोऱ्याच्या उंची वाढवण्यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्युत मनोऱ्याची उंची अखेर वाढवण्यात आली.

मनोऱ्याची उंची वाढल्यामुळे हा महामार्ग वाहतूकीसाठी अखेर खुला झाला आहे. याआधी पर्यायी रस्त्यांचा वापर केला जात होता. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्याने नागरिकांनी आमदार मा. धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले.

बापाच्या स्वप्नपूर्तीसाठी बकऱ्या चोरल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या