19.1 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर घरकुल, दिव्यांगाना आर्थिक मदत देण्यात यावी

घरकुल, दिव्यांगाना आर्थिक मदत देण्यात यावी

एकमत ऑनलाईन

रेणापूर : पंतप्रधान घरकुल योजना, दिव्यांगाना आर्थिक मदत वाटप करावी व नगर पंचायत पासून ते संभाजी नगरपर्यंतच्या रस्त्याचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने नगरसेवक भूषण पनुरे यांनी नगर पंचायती समोर शुक्रवारी दि. १४ रोजी अमरण उपोषण सुरू केले. लेखी आश्वासनानंतर उपोषणाची मागे घेण्यात आले.
प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम नगर पंचायतीने मंजुरी देऊन लाभार्थ्याचे कामे सुरू केले आहे.

परंतु नगरपंचायतीने सदरील कामाकडे दुर्लक्ष करून लाभार्थ्याचे शासनाकडून येणारे अनुदान अद्याप मिळाले नाहीे. तसेच दरवर्षी दिव्यांगाना शासनाकडून आर्थिक मदत मिळते परंतु मागील वर्षाचे कांही व या वर्षाचे नगर पंचायतीने दिव्यांगाना आर्थिक मदत दिली नाही. नगर पंचायत पासून ते संभाजी नगर या रस्त्याची खुप दुरवस्था झालेली आहे.

याबाबत वारंवार निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्याने नगरसेवक भूषण पनुरे यांनी अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानूसार पनुरे यांनी शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असता प्रशासनाने या मागण्याची दखल घेत नगरपंचायतीकडे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वाटप त्वरीत करण्यात येईल तसेच दिव्यांगाना आर्थिक मदत करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयामार्फत ५ टक्के निधी देणे आवश्यक आहे.

परंतु कोरोना (कोव्हीड- १९ ) या संसर्ग आजरामुळे वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. न.प. फंड या खात्यावर उपलब्ध असलेल्या निधीतून शासन नियमानुसार आर्थिक मदत लवकरच वितरीत करण्यात येईल. रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. परंतु कोणताही निधी या वर्षात उपलब्ध झाला नाही निधी उपलब्ध झाल्यानंतर रोडचे काम करण्यात येईल असे लेखी आश्वासन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी गोंिवद पाटील, पंडीत माने , बाळकृष्ण माने, गणेश सौगदर, हनमंत पवार बाळू खटाळ , सचिन इगे, प्रदिप काळे, रोहित गिरी, शाम मोरे, निलेश उरगुंडे उपस्थित होते.

उदगीरसाठी ‘कोवीड १९’ तपासणी प्रयोगशाळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या