25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ येथे पहिले डिजीटल रेशंिनंग दुकान

शिरूर अनंतपाळ येथे पहिले डिजीटल रेशंिनंग दुकान

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : महाराष्ट्र शासनाने रास्त भाव दुकाने आयएसओ करण्याबाबत आदेशित केले असून त्या अनुषंगाने शहरात तालुक्यातील पहिल्या डिजिटल रेशंिनग दुकानाची सुरुवात सरोजाबाई गायकवाड यांच्या दुकानाने करण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालयात रास्त भाव धान्य दुकानदारांना आय एस ओ मानांकन प्रणाली बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी प्रशिक्षण दिले आहे. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे,तहसीलदार अतुल जटाळे ,नायब तहसीलदार राहुल पत्रिके, रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष उमाकांतअप्पा बोळेगावे, उपाध्यक्ष एस.एम.पटणे, सचिव नारायण जाधव,प्रकाश माडे, शिंदाळकर,हणुमंत चव्हाण,नारायण नाळापुरे,सरोजाबाई गायकवाड,राहुल बानाटे उपस्थित होते.

दरम्यान जल्हिाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या संकल्पनेतून राशन दुकाने हायटेक व डिजिटल करण्यास सुरुवात झाली असून यापुढे शिधापत्रिका धारकांना धान्य घेताना रेशंिनग दुकानदार सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.यासाठी शहरातील सरोजाताई गायकवाड यांचे दुकान सज्ज झाले आहे.दुकानात अत्याधुनिक सेवांसह सर्व सोयी सुविधायुक्त व सुसज्ज दुकानाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी उत्कृष्टपणे नर्धिारीत वेळेत ९० टक्के पेक्षा जास्त धान्य वितरित केलेल्या अठरा दुकानदारांचा जिल्हा पुरवठा अधिकारी पडदुने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांनी तर आभार हणमंत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडूरंग हाणमंते, सुधीर गायकवाड, इंद्राळे, शिंदाळकर, उत्तम दंडेवाड यांनी परश्रिम घेतले. या प्रसंगी तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या