22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरविश्वेश्वरय्याची जंगाले महाविद्यालयातून प्रथम

विश्वेश्वरय्याची जंगाले महाविद्यालयातून प्रथम

एकमत ऑनलाईन

औसा: तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षा २०२२ चा निकाल घोषित झाला असून महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी उज्वल यशाची पंरपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील ३३ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून १६९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. महावद्यिालयातील सिव्हील अभियांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षातील ऋतुजा जंगाले महाविद्यालयातून प्रथम, वैष्णवी पाटील व्दितीय, ओम देवकर तृतीय, रोहित भिसे गुणवत्तेने उत्तीर्ण झाला झाले आहेत, संगणक शाखेच्या अंतिम वर्षातील गंधर्व कुलकर्णी महाविद्यालयातून प्रथम, चिन्मय शेटे व्दितीय, अभिजित व्यवहारे तृतीय श्रेणीत आला आहे, मेकॅनिकल शाखेतील कुलदीप देशपांडे महावद्यिालयातून प्रथम, रमन मुसांडे व्दितीय, अनुराग कुलकर्णी तृतीय स्थानी आहे, ईलेक्ट्रीकल शाखेच्या अंतिम वर्षातील करण आदुडे महाविद्यालयातून प्रथम, रोहन पवार व्दितीय, वसुधा मुदगडे तृतीय आली आहे तर ईलेक्ट्रॉनक्सि अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षात ईस्माईल मचकुरी महाविद्यालयातून प्रथम, ंिलबनाथ बनसोडे व्दितीय, प्रतीक्षा तळेकर तृतीय आली आहे.

व्दितीय वर्षामध्ये संगणक अभियांत्रिकी शाखेतील संजना जाधव प्रथम, अंजली जाधव द्वितीय, स्वाती पाटील तृतीय आली आहे. ईलेक्ट्रलकल शाखेतील सुषमा घंटे प्रथम, अर्पिता ंिहगमिरे द्वितीय, मेकॅनिकल शाखेतील सागर मुकडे प्रथम, शिवानंद सुतार द्वितीय स्थानी आहे तर ईलेक्ट्रॉनक्सि अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतून पायल चव्हाण प्रथम आली आहे. प्रथम वर्षातील संगणक अभियांत्रिकी शाखेतील अक्षय गिते प्रथम, अल्फीया कारभारी व्दितीय, प्रथमेश बावगे तृतीय आला आहे. ईलेक्ट्रलकल शाखेतील अनिकेत घोटाळे प्रथम, कृष्णा बिराजदार व्दितीय, हार्दिक सुरवसे तृतीय आला आहे, मेकॅनिकल शाखेतील त्र्यंबक पाटील प्रथम, आयुष कुमार व्दितीय स्थानी आहे. सिव्हील शाखेतील मुहराज मुल्ला महाविद्यालयातून प्रथम, प्रणिता कदम व्दितीय आली आहे तर ईलेक्ट्रॉनक्सि अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतून स्वप्नील प्रथम आला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, उपप्राचार्य गोपाळ दंडिमे, विभाग प्रमुख रेवण बुक्का, प्रवणि साबदे, मंगेश बिडवे, अंकुश बिडवे, संदेश माडे आदींनी अभिनंदन केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या