लातूर : प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाविद्यालयात संस्कृत विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय संस्कृत स्तोत्र, सुभाषिते व संस्कृत गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यालयीन व महाविद्यालयीन असे स्वतंत्र दोन गट करण्यात आले होते. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील अनेक विद्यालये व महाविद्यालयानी सहभाग नोंदविला होता. यात दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीत शिकणा-या मृणाल कुलकर्णी व गार्गी शेटे यांनी वैयक्तिक सादरीकरणात सहभाग नोंदविला.
तर सामूहिक गटात शिवाली व्हत्ते, नाझिया पठाण, सेजल सोनी, अमृता माकणे, जान्हवी कुलकर्णी व मृणाल कुलकर्णी या विद्यार्थिनींनी कालिदासो जने जने हे संस्कृत गीत सादर करून स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. यांना हार्मोनियमची साथ आरती झुंजे यांनी दिली. या स्पर्धेत दयानंद वाणिज्य महाविद्यालयाने प्रथम येण्याचा मान पटकावला आहे स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका सुवर्णा कारंजे यांनी विशेष परिश्रम घेतले. विजेत्या संघाचे प्राचार्य डॉ. राजाराम पवार यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. अंजली बुरांडे, प्रा. सुभाष मोरे, पठाण आदी उपस्थित होते.