24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील साडेपाच लाख नागरिकांनी घेतली लस

लातूर जिल्ह्यातील साडेपाच लाख नागरिकांनी घेतली लस

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घट असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणास वेग आला आहे. आतापर्यंत ५ लाख ४३ हजार ८५१ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यापैकी ४ लाख ३५ हजार ४६६ नागरिकांना पहिला तर १ लाख ८ हजार २८५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचे २६.४५ टक्के उद्दिष्ट आतापर्यंत साध्य झाले आहे.

गेल्या १५-२० दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत चालली आहे. सद्य:स्थितीत १९४ रुग्ण उपचराधीन आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांच्या वर आहे. रुग्णसंख्या घटू लागताच लसीकणाला वेग आला आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या ता आहेत.

आतापर्यंत ४ लाख ६२ हजार १५६ नागरिकांनी कोविशिल्ड तर ८९ हजार ९२३ नागरिकांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे. कोविशिल्डचा वापर ८४ टक्के तर कोवॅक्सिनचा वापर १६ टक्के झाला आहे. एकुण पाच लाख ४३ हजार ८५१ नागरिकांनी लस घेतली असून त्यात ३ लाख १ हजार ३४१ पुरुषांनी तर २ लाख ४२ हजार ५१० महिलांनी लस घेतली आहे. फ्रं ट लाईन कर्मचा-यांचे १०५ टक्के लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचा-यांच्या लसीकरणाचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. १८ ते १४ वर्षे वयोगटातील युकांचे ७ तर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण ४२ टक्क्यांपर्यंत झाले आहे.

जिल्ह्यात २० लाख ५६ हजार ८३ लाभार्थ्यांपैकी ५५ टक्के पुरुष तर ४५ टक्के महिलांचा समावेश आहे. या उद्दिष्टातील एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहु नये, यादृष्टीने आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंं द्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि काही उपकेंद्रातही लसीकरण केंद्र कार्यान्वित केलेले आहेत. महानगरपालिका हद्दीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था आणि महानगरपालिकेच्या काही केंद्रांवर लस दिली जात आहे. शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे.

कोविशिल्ड मिळत नसल्याची नागरिकांची ओरड
कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून संबंधीत नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्याबाबत तारखेसह मोबाईल फोनवर ‘एसएमएस’ येतो. तसेच शहर व ग्रामीण भागातील कोणत्या केंद्रांवर कोविशिल्डचा डोस उपलब्ध आहे याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली जाते. त्यामुळे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी त्या केंद्रावर जातात. रांगा लागतात आणि अर्धा-एक तासातच कोविशिल्ड संपल्याचे सांगण्यात येते. तासन्तास रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस न घेताच परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिक वैतागते असून कोविशिल्ड मिळत नसल्याची ओरड होत आहे.

क्षमता दररोज २५ हजार डोस देण्याची मात्र…
कोविशिल्ड असो की, कोवॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा मागणीनूसार होत नसल्यामुळे त्याचा परिणाम लसीकरणावर होत आहे. दररोज २५ हजार डोस देण्याची क्षमता लातूर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे आहे. मात्र, पुरवठा मागणीनूसार होत नसल्याने दररोज १० हजार डोसही देता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शासनाकडून मागणीनूसार पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा आरोग्य यंत्रणेची आहे.

जरंडेश्वरप्रमाणेच आणखी ३० साखर कारखान्यांच्या विक्रीत गैरव्यवहार, त्यांचीही चौकशी करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या