23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरस्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. ज्यांनी, ज्यांनी या देशासाठी आपलं सर्वस्व त्यागून बलिदान दिलं. काहींनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं. त्या सर्व ज्ञात, अज्ञात वीरांचे स्मरण करुन त्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अभिवादन केलं. येत्या १७ सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्ती लढ्याचा अमृत महोत्सव सुरु होतो आहे. तोही मोठ्या उत्साहात आपल्याला जिल्ह्यात साजरा करु, अशी भावना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली.

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपती यांचे गुणवत्ता पूर्ण सेवेचे पोलीस पदक सन -२०२२ लातूर जिल्हा पोलीस दलातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गूलाब महेबूब गूलाम हैदर गल्लेकाटू यांना गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) दत्तात्रय गिरी, सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम शिरुर अनंतपाळ, सर्वोत्कृष्ट क्लस्टर प्रथम अहमदपूर तालुक्यातील वळसंगी, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम औसा तालुक्यातील आलमला, राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका प्रथम निलंगा, सर्वोत्कृष्ट क्लसर औसा तालुक्यातील आलमला, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम चाकुर तालुक्यातील अलगरवाडी महाआवास अभियान-ग्रामीणांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय लघुद्योजक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आदर्श तलाठी, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव, रास्त भाव दुकानदारांचा सत्कार करण्यात आला. वीरमाता, वीरपत्नी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंिबय, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, पत्रकार यांची भेट घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या