24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरअमृत सरोवर स्थळी होणार ध्वजारोहण

अमृत सरोवर स्थळी होणार ध्वजारोहण

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात अमृत सरोवर योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात ९३ अमृत सरोवरांची निर्मिती किंवा पुनर्जीवित करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्यापैकी ३८ सरोवरांची निर्मिती, पुनर्जीवन पुर्ण करण्यात आले आहे. तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अमृत सरोवर स्थळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या महत्त्वाच्या प्रसंगांचे स्मरण करण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ जलाशये निर्माण अथवा पुनर्जिवीत करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे. सदर योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते दि. २४ एप्रिल २०२२ पंचायती राज दिवस’ रोजी करून योजनेस ‘अमृत सरोवर योजना’ असे नाव देण्यात आले. प्रत्येक सरोवर किमान एक एकर (०.४ हेक्टर) आकारमानाचे व किमान १० हजार क्युबिक जलसाठा क्षमतेचे असावे. संपूर्ण देशात ५० हजार अमृत सरोवरांची निर्मिती केली जाणार आहे. अमृत सरोवर योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत पुनर्जिवित झालेल्या ३८ पैकी १५ अमृत सरोवर स्थळी व लातूर जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत मनरेगा मधुन निर्माण होणा-या १० अमृत सरोवर स्थळी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या