23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरलेंडी नदीच्या पुलावरून पुराचे पाणी

लेंडी नदीच्या पुलावरून पुराचे पाणी

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
पावसाळ्यात सतत येणा-या पुरामुळे दैठणा गावांजवळील लेंडी नदीवरील पुलावरून पाणी जात असल्याने शेतकरी, वाहनधारक व ग्रामस्थांना पूर ओसरण्याची तासन तास वाट पहावी लागत असून नागरिकांना जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागत आहे मात्र यांवर प्रशासन शांत तर लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असून या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी दैठणा सह परिसरातील ग्रामस्थांतून केली जात आहे.

तालुक्यातील दैठणालगत असलेल्या लेंडी नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पुराचे पाणी जाऊन रस्ता बंद होतो. त्यात २०१८ साली हा पूल अतिवृष्टीने वाहून गेला होता. त्यानंतर या नदीवर त्याच उंचीचा तात्पुरता पुल बांधण्यात आला.त्यामुळेa दैठणा व परिसरातील गावांसह उदगीर कडील अनेक गावांचा संपर्क तुटतो, त्यात सध्या उदगीर महामार्गाचे काम सुरू असल्याने याच पुलावरून वाहतूक करावी लागत आहे.मात्र या पुलावरून पाणी जात असल्याने वाहनांना ताटकळत थांबावे लागत असून यांकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही असा संतप्त सवाल दैठण्याचे योगेश बिरादार यांनी व्यक्त केला.

दरम्यान तालुक्यातील दैठणा व परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता असलेल्या लेंडी नदीच्या पुलावरून प्रवास करावा लागतो. तालुका गाव असलेल्या शिरूर अनंतपाळ शहरात दैनंदिन कामांना जाण्यासाठी हा महत्वाचा व एकमेव रस्ता आहे. प्रत्येक पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या पाण्यातून वाट काढत शाळा, महाविद्यालय, दवाखाना, कामगारांना कामावर, शेताकडे जावे लागत आहे. प्रत्येक वर्षी या नदीवर पुराने रहदारी बंद होत असल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या