24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात गुंफले जाणार पुष्प

जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात गुंफले जाणार पुष्प

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ति संग्रामाचे दि. १७ सप्टेंबर २०२२ पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे. युवकांना मराठवाडा मक्ति संग्रामाची ओळख व्हावी, मागच्या पिढ्यांचा या स्वातंत्र्यासाठीचे बलिदान, त्याग, समर्पण कळावे म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून सोमवार दि. १९ ते २६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक महाविद्यालयात व्याख्यानमालेचे एक पुष्प गुंफले जाणार आहे.

व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दयानंद कला महाविद्यालयात येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि ज्येष्ठ लेखक, अभ्यासक प्रा. सोमनाथ रोडे, ज्येष्ठ लेखक, विचारशलाकाचे संपादक प्रा. नागोराव कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. मंगळवार दि. २० सप्टेंबर रोजी राजर्षी शाहू महाविद्यालयात व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प राज्यशास्त्राचे अभ्यासक, प्रा. भूषण जोरगुलवार यांच्या व्याख्यानाने गुंफले जाईल. तर बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे इतिहास अभ्यासक, मराठवाडा मुक्ती संग्रामवर विशेष अभ्यास असलेले भाऊसाहेब उमाटे यांचे व्याख्यान असेल.

गुरुवार दि. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे साहित्यिक आणि इतिहास अभ्यासक विवेक सोताडेकर यांचे तर शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक जयप्रकाश दगडे यांचे व्याख्यान असेल. शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे साहित्यिक प्रा. जयद्रथ जाधव आणि जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे होणार असून यासाठी मराठवाडा मुक्ति संग्रामाचे अभ्यासक जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णा महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत देशमुख हे या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या