लातूर : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. राज्यपातळीवर वाढती रुग्णसंख्या पाहता परराज्यातून येणा-या नागरिकांसाठी काही अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर आरोग्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो. यासाठी लातूर शहरातील नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी निर्देशांचे पालन करावे अन्यथा नाईलाजाने महानगरपालिकेला दंडात्मक कारवाई करावी लागेल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून आपल्या देशात व राज्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शहरातील नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या चर्चेत कोरोनाविषयी गांभीर्य दिसून येते परंतु, वर्तणुकीत निष्काळजीपणा दिसून येत आहे. नागरिक बाजारपेठेत बिनधास्तपणे वावरत आहेत. बहुतांश नागरिकांच्या चेह-यावर मास्क, रुमाल नसतो. मास्क असला तरी तो हणवटीवर असतो. सोशल डिस्टन्सिंगीचे पालन होताना दिसत नाही. सॅनिटायझरचा वापर दिसून येत नाही. पुर्वी स्वत:हुन दुकानदार ग्राहकांना
सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात त्यात काहीशी घट झाली. परंतु दिपावली नंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी शक्यतो अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा तसेच वारंवार हात धुवावेत. सॅनिटायझर वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
शहरात नऊ दिवसांत २७९ रुग्णांची भर
दिवाळीपूर्वी लातूर शहरातील कोरोनाचा मीटर मंदावला होता. परंतु दिवाळीनंतर म्हणजेच दि. १६ ते २४ नोव्हेंबर या नऊ दिवसांत कोरोनाने पुन्हा उचल खालली आहे. कोरोनाचा मीटर पुन्हा गती घेतो आहे. त्यामुळे याच नऊ दिवसांत २७९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. १६ नोव्हेंबर रोजी ८, १७ रोजी ३९, १८ रोजी २२, १९ तारखेला १७, २० रोजी ४३, २१ ला २९, २२ रोजी ३३, २३ तारखेला ४९ तर २४ नोव्हेंबर रोजी ३९ अशी कोरोनााबाधितांची रुग्णसंख्या वाढत गेली. आजघडीला लातूर शहरात एकुण ८ हजार २४७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ८९३ एवढी आहे तर १४४ पुरुष, ५३ महिला असे एकुण १९७ मयत झाले आहेत.