22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeलातूरअधिक उत्पादनासाठी इस्त्राईलच्या धर्तीवर सुक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावा - ना.अमित विलासराव देशमुख

अधिक उत्पादनासाठी इस्त्राईलच्या धर्तीवर सुक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा वापर करावा – ना.अमित विलासराव देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : या वर्षात बऱ्यापैकी पाऊस होवुन पाण्याची उपलब्धता झाली असली तरी शेतकऱ्यांनी इस्त्रायलच्या धर्तीवर सुक्ष्मसिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्पादकता वाढवावी त्याच बरोबर साखर कारखान्यांनीही उपपदार्थ निर्मीती बरोबरच सहउदयोग उभारून सक्षम बनावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री, लातूर मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख यांनी केले.

लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री, लातूर मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन वैशाली विलासराव देशमुख या होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. व्यकंट बेद्रे, बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजुळगे, विकासरत्न विलासराव देशमुख साखर कारखानाचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, माजी चेअरमन धनजय देशमुख,जागृतीचे व्हा.चेअरमन लक्ष्मणराव मोरे,शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव,जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी पूढे बोलतांना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, मागच्या वर्षी पाऊस नसल्यामूळे आपल्या भागातील कारखाने सुरू होवु शकले नव्हते यावर्षी मांजरा परीवारातील सर्व साखर कारखाने सुरू होत असुन ती पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. यातून सभासद शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीचा भावही दिला जाणार आहे. आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होवुन ऊस उत्पादनासाठी अडचण निर्माण होवू दयायची नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी इस्त्राइलच्या धर्तीवर भर देणे आवश्यक आहे त्यासाठी कारखान्याच्या वतीने सर्व प्रकारची मदत कली जाणार आहे.

दिलीपरावजी देशमुख मांजरा परीवाराचे कर्णधार
आदरणीय विलासराव देशमुख साहेब दूरदृष्टीतून उभे राहिलेले मांजरा परीवारातील सर्व साखर कारखाने चांगल्या पध्दतीने चालतात. त्यामूळे या परीसरात आर्थिक क्रांती घडलेली आहे. जिल्हयातील सहकार क्षेत्राला दिशा देणारे आदरणीय दिलीपराव देशमुख या परीवाराचे कर्णधार असून त्‍यांच्या कडक शिस्तीमुळेच या परीवाराला हे वैभव लाभले असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी बोलतांना सांगितले. परीवारातील सर्व साखर कारखान्यात समन्वय आहे चांगल्या गोस्टीचे सर्वच कारखान्यात अनुकरण केले जाते आहे. भविष्यातही याच पध्दतीचे काम या परीवारात होत राहील.

साखर कारखान्यांनी सहउदयोग उभारावेत
आगामी काळात या साखर कारखान्याने उपपदार्थ निर्मीतीवर भर देणे गरजेचे आहे. इथेनॉल निर्मीती सहविज निर्मीती या गोस्टी तर सुरू आहेतच परंतु त्या सोबतच सॅनिटाइझर, ऑक्सिजन इतर वैदयकीय साहित्य व उपकरणे निर्मीतीच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. बगॅस पासून कागद, प्लेटस, कप अश वस्तुची निर्मीती करावी लागणार आहे. ऑफसिझनच्या काळात इतर वस्तु व साहित्यनिर्मीतीचे सहउदयोग निर्माण करणे शक्य आहे का त्याचाही अभ्यास करावा अशी सुचना पालकमंत्री यांनी केली.

वैदयकीय शिक्षणाचे जाळे निर्माण करावेत
आदरणीय विलासराव देशमुख यांच्या नेतृतवाच्या काळात जिल्हयात शैक्षणिक सुवीधा निर्माण करण्यात आल्या त्यातून आदर्श शैक्षणिक पॅटर्न निर्माण होवू शकला असे सांगून संधीचे सोने निर्माण करणाऱ्या जिल्यातील जाणकार मंडळीनी वैदयकीय शिक्षणाचे जाळे निर्माण करण्यासाठी आवाहन करावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले. विलासराव देशमुख फाऊंडेशन व विलास साखर कारखान्याच्या वतीने वैदयकीय क्षेत्रात लवकरच एक प्रकल्प हाती घेण्यात येईल असे सुतोवाच यावेळी त्यांनी केले.

२६ मे २०२१ रोजी स्मृतिस्थळ लोकार्पण
विलास सहकारी साखर कारखान्याने अल्पावधीत मोठी झेप घेऊन देशभरात लौकीक निर्माण केला आहे. आगामी काळात या ठिकाणी प्रशिक्षण, संशोधन यासारख्या क्षेत्रात काम सूरू होणार असल्याचे सांगून कारखाना परीसरातील आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या जयंती वर्षानिमीत्त २६ मे २०२१ रोजी स्मृतिस्थळ लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी योवळी सांगितले. यानिमीत्ताने अनेक उपक्रम सुरू होतील असे त्यांनी म्हटले.

ऑलीव्हचा प्रयोग यशस्वी झाल्यास मराठवाडयात आर्थिक क्रांती
विलास साखर कारखाना स्थापनेपासूनच नवेनवे प्रयोग राबविणाऱ्या विलास साखर कारखान्याच्या परीसरात आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिस्थळा नजीक वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री, लातूर मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख व कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख त्यांच्या हस्ते ऑलीव्ह (जैतुनां) च्या रोपाची लागवड करण्यात आली.

ऑलीव्ह (जैतुना)चे उत्पादन हा एक प्रयोग असुन तो यशस्वी झाल्यास आपल्या भागातील शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरणार असून त्यातून मोठी रोजागरनिर्मीती होणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी नंतरच्या जाहीर कार्यक्रमात बोलंताना सांगितले. ऑलीव्हचे पिक कमी पाण्यात येते आणी यापासून निर्माण होणारे तेलात औषधी गुणधर्म आहेत. ते खादयतेल म्हणून वारण्यात येते त्यास मोठी किंमत मिळते. राज्यस्थानात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. मराठवाडयातील वातावरण राजस्थानशी मिळतेजुळते आहे. लातूर जिल्हयात त्या संदर्भाने आपण प्रयोग करावयाचा ठरवला आहे तो यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे तसे घडल्यास आपल्या परीसरात आर्थिक क्रांती शक्य होणार आहे असेही पालकमंत्री देशमुख यांनी या प्रसंगी बोलतांना म्हटले आहे.

कठीण काळात माणुसकी जपणे हीच भारतीय संस्कृती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या