24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeलातूरऔसा तालुक्यात २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी

औसा तालुक्यात २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी

एकमत ऑनलाईन

शहरातील ९, हिप्परगा रुग्ण संपर्कातील १३ जणांचा समावेश,  एक रुग्णालय सील व डॉक्टरसह ५ जण होम क्वारंटटाईन

औसा : औसा शहरात एक व हिप्परगा गावातील एका व्यक्तीचा अहवाल बुधवारी रात्री कोरोना पॉझीटीव्ह आल्याने बाधित रुग्णाच्या घराचा परिसर प्रशासनाने सील करीत रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ व औसा शहरातील ४ तर शहरातील बाधित रुग्णांची तपासणी केलेले हॉस्पिटलचे डॉक्टर व तेथील ४ आरोग्य कर्मचारी असे एकूण औसा तालुक्यातील २२ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिका-यांनी दिली आहे.दरम्यान प्रशासनाने औसा शहरातील हे रुग्णालय सील केले आहे व २१ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

मंबई येथून प्रवास करून हिप्परगा (ता. औसा) येथे आठ जण आले होते. दरम्यान यामधील एका व्यक्तीला कोरोना सदृर्श लक्षणे दिसून येत असल्याने वैद्यकीय चाचणीसाठी लातूर येथे घेऊन जाण्यात आले होते. मात्र या व्यक्तीचा अहवाल बुधवारी रात्री कोरोना पॉझिटीव्ह आला. यानंतर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर आर शेख , सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. भारती यांनी रात्री हिप्परगा येथील गावात भेट देत बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेतली. व गुरूवारी सकाळी आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाचे पथक दाखल झाले आणि हा परिसर सील करीत बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

याच बरोबर आरोग्य विभागाकडून या भागातील सर्व ग्रामस्थांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत असून मुंबईहून परतलेल्या या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी अमजद पठाण, वैद्यकीय अधिकारी एस. एस. हिंडोळे , ग्रामसेवक तुकाराम बिराजदार, तलाठी निळकंठ जाधव, एच. डी. राठोड, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

औशातील कादरीनगर परिसर सील
औसा शहरातील कादरी नगर परिसरात एक सेवानिवृत अधिकारी यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने, बाधित रुग्णाच्या घराचा परिसर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने दि. ३ जून २०२० बुधवारी रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परिसर सील करण्यात आला आहे. सोलापूर येथून प्रवास करून आलेल्या औशातील कादरी नगरात राहणा-या वृद्ध व्यक्तीचा अहवाल बुधवारी सायंकाळी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागासह, अधिकारी औसा नगरपालिका विभागासह मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिका-यासह औसा तहसीलदार यांनी तातडीने भेट देत तो परिसर सील केला आहे.

बाधित रुग्ण लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, औशाचे तहसीलदार शोभा पुजारी, वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक एन बी ठाकूर प्रभागाचे नगरसेवक जावेद शेख यांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या