31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home लातूर आग प्रतिबंधक यंत्रणा सक्तीने बसवा

आग प्रतिबंधक यंत्रणा सक्तीने बसवा

एकमत ऑनलाईन

लातूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शहरासह जिल्ह्यातील सरकारी, धर्मादाय संस्थांतर्गत, खाजगी रुग्णालये व दवाखाने, शाळा, महाविद्यालयांच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आदेश जारी केला आहे.

उंच इमारती, शाळा, महाविद्यालये, अत्यावश्यक सेवा जसे रुग्णालये, दवाखाने, खाजगी क्लासेस, व्यवसायिक संकुले यांच्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाय तसेच प्रथमोपचार आणि संकटकालीन मार्ग अशा उपाययोजना करुन त्याचे वेळोवेळी प्रात्यक्षिक घेणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मध्ये तरतूद आहे. सदर उपाययोजना न केल्यामुळे यापूर्वी सूरत येथे सन २०१९ मधील घटना तसेच भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दुर्घटना घडल्याची उदाहरणे आहेत. आगीच्या अशा घटनेत आग प्रतिबंध व संकटकालीन मार्ग सुनिश्चित करणे अत्यंत महत्वाचे आहे.

कायद्यानूसार पहिल्या टप्प्यात लातूर शहरासह जिल्ह्यातील सरकारी, धर्मादाय संस्थांतर्गत खाजगी रुग्णालये, दवाखाने, शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोचार आणि संकटकालीन मार्गाबाबत सक्तीने उपाययोजना करुन घ्याव्यात व तसा अहवाल सादर करावा, या कामासाठी संबंधीत आरोग्य विभागाच्या विभागप्रमुखांनी सनियंत्रण करावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आदेश काढले आहेत.

सक्तीने करुन घेण्याचे फर्मान
सर्व प्रकारची रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांत आग प्रतिबंधात्मक उपाययोजना सक्तीने करुन घेण्याचे फर्मान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिका-यांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सोडले आहे.

पहाटे पाचला अधिकारी पोहचले हागणदारीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या