26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरचार महिन्यांचे घरगुती वीज बील माफ करा

चार महिन्यांचे घरगुती वीज बील माफ करा

एकमत ऑनलाईन

औसा : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशात व राज्यात लॉकडाऊन असल्याने नागरीकांची आर्थिक उत्पन्नाची साधने विविध कारणाने बंद झाली असून सर्वसामान्य नागरीक आर्थिक अडचणीत असल्याने राज्यशासनाने मार्च ते जुलै या चार महिन्यांचे घरगुती वापराचे वीज बील माफ करावे, अशी मागणी एम आय एम पक्षाच्या औसा शाखेने केली आहे.

करोना विषाणूच्या संकटामुळे मार्च ते जुलै या चार महिन्यात केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण राज्यातील जनता आर्थिक संकटात आहे. उद्योग, कारखाने, व्यापार व रोजगार बंद असल्याने उत्पन्नाची सर्व साधने बंद आहेत. सर्वसामान्य जनतेकडे रोख रक्कमच नसल्याने चार महिन्याचे वीज बील भरायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कालावधीत वीज वितरण कंपनीने एप्रिलपासून दरवाढही केली आहे.

सर्व सामान्य जनतेला आपल्या दैनंदिन गरजा भागविणे अवघड झाले आहे. आपल्या कुटूंबांला जगविण्यासाठीची धडपड सुरू असताना चार महिन्यांच्या वीज बीलाचा भरणा करणे शक्य नाही.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोव्हिड १९ या नैसर्गिक महामारीच्या काळातील घरगुती वापराचे वीज बील माफ करावे अशी मागणी एम आय एम वतीने औसा तहसीलदार यांच्यापर्यत एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एमआयएमचे अ‍ॅड गफरुल्ला हाशमी, सय्यद मुजफ्फरअली इनामदार, कलिम सय्यद, अ‍ॅड रफिक शेख, न्यामत लोहारे, अजहर कुरेशी, नईम शेख, आदीच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत . दरम्यान सर्वसामान्य जनतेच्या या मागणीसाठी एमआयएमने राज्यपातळीवर आंदोलनाची तयारी केली असून याचा पहिला टप्पा म्हणून राज्यभरात सर्व तहसील कार्यालयात निवेदने देण्यात आली असून, सोमवारी दि २० जुलै रोजी रात्री ८ वाजता पाच मिनीट लाईट बंद आंदोलन करुन या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे अशी माहिती मुजफ्फरअली इनामदार यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली आहे.

Read More  लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याचे भाव वाढले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या