27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरलातूरचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेश माने यांचे कोरोनामुळे निधन

लातूरचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेश माने यांचे कोरोनामुळे निधन

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेश माने यांचा कोरोनामुळे आज उपचारादरम्यान सोलापूर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. नागेशकुमार माने यांना 22 जुलै रोजी उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

आज उपचारादरम्यान सोलापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. मृत्युसमयी ते 48 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री आणि अहमदनगरचे माजी आमदार अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा आणि सुनेचा कोरोना अहवाल अद्याप बाकी आहे. या सर्वांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राठोड आणि त्यांच्या पत्नीच्या संपर्कातील इतर लोकांचेही स्वॅब नमुने घेतले जात आहेत. त्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत. अहमदनगरमधील एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 817 वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 2 हजार 418 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Read More  अवैधरित्या साठवलेला बियरचासाठा जप्त : जिंतूर पोलीसांची कार्यवाही

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या