18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरमाजी नगराध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

माजी नगराध्यक्षांचा आत्मदहनाचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

चाकूर: शेतक-याना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, शेतमजूरावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यांनाही आर्थिक मदत द्यावी. या प्रमुख मागणीसाठी माजी नगराध्यक्ष मिलींद महालिंगे यांनी शुक्रवारी चाकूर येथे कमाणीच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पकडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पुरती वाट लागली आहे. टमाटे, ऊस बागायती शेती याही पिकांना फटका बसला आहे. ऊसाचे फड आडवे पडले आहेत. नदीकाठच्या जमीनी पिकासह वाहून गेल्या आहेत. शेतक-या बरोबरच शेतमजूरही देशोधडीला लागला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ न मिळाल्यास शुक्रवारी दुपारी दोन वाजता चाकूरच्या कमाणीच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष मिंिलद महांिलगे यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता.त्यानुसार शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माजी नगराध्यक्ष मिंिलंद महांिलगे, जेष्ठ नेते लक्ष्मण तिकटे,सुग्रीव महांिलगे, पप्पू सरवदे, ज्ञानोबा महांिलगे,शरद किनीकर, प्रकाश महांिलगे,बालाजी मोठेराव,चेतन महांिलगे,अजय वाघमारे, नागसेन महांिलगे, नितीन डांगे,आनुज कांबळे, नामदेव कांबळे, विनायक कांबळे,हबीब शेख यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी आंदोलकानी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतक-यांना मिळालीच पाहिजे, शेतमजूरांनाही आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलन स्थळी तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलिस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांनी आंदोलन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आंदोलनात्मक पवित्रा
शेतक-यासह शेतमजूरानांही जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,असे सांगून चाकूर तालुक्यातील ४७ हजार हेक्टरवर खरीपाच्या सोयाबीन पिकाची लागवड केली होती, त्यापैकी ४५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्यात गेले असून सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत. नदीच्या काठावर असलेल्या शेतातून पुराचे पाणी गेल्याने शेतजमीन सोयाबीनसह वाहून गेले आहे.तेव्हां त्वरित आर्थिक मदत दिली पाहिजे असे माजी नगराध्यक्ष मिलींद महांिलगे यांनी दैनिक एकमतशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या