31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeलातूरमहाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईच्या तज्ज्ञ संचालकपदी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी, सहकारी कारखानदारीत प्रदीर्घ अनुभव असलेले विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातून तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,लोकप्रतिनिधी सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीपराव देशमुख साहेब यांचे अभिनंदन केले.

राज्य सहकारी साखर संघ हा राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो तसेच कारखान्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कामगार, कर्मचारी यासाठी सरकार पातळीवर प्रशासन सोबत कारखान्याची बाजू मांडून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याचे काम या राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातुन होत असते. राज्यातून तज्ज्ञ संचालकपदी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थ राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची सार्थ निवड
राज्य सहकारी साखर संघावर तज्ज्ञ संचालक म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड सार्थ आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सहकार व साखर इंडस्ट्रीजमधील गेल्या ४० वर्षांमधील अनुभव त्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर परिवारातील सर्व ९ साखर कारखाने पारदर्शकता ठेवून त्यांच्याच मार्गदर्शनाने अतिशय चांगल्या पद्धतीने पारदर्शकता ठेवून कार्य करीत आहे. त्यांनी उभ्या केलेल्या सहकार क्षेत्रातील संस्था अव्वल स्थानावर आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थां त्यांच्याच मार्गदर्शनाने अतिशय चांगल्या पारदर्शकता ठेवून अचूक कार्य करत आहेत. त्यामुळे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची निवड सार्थ ठरली आहे. राज्यातून झालेली निवड लातूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या