लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील कासारखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचे पॅनल निवडून आलेल्या सर्व नूतन संचालकांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी बुधवारी भेट घेतली. त्यावेळी नूतन संचालक मंडळाचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नूतन सदस्य रघुनाथ शिंदे, कमलाकर शिंदे, निळकंठ शिंदे, जयंिसग शिंदे, चंद्रकांत देवकते, सुभाष माने, गणपतराव शिंदे, वसंत शिंदे, दिलीप थोरात, पिरपाशा तांबोळी, गोविंदराव शिंदे, विश्वनाथ गडदे, बब्रुवान चिकाटे उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रतापराव शिंदे, दगडू देशमुख सोपानराव शिंदे, माजी-चेअरमन व्यंकटेश शिंदे, बळीराम देशमुख, बालासाहेब शिंदे, नरसिंग देवकते, सरपंच सुमीत शिंदे, उप-सरपंच गोविंद शिंदे, अनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आशियाना निवासस्थानी जिल्ह्यातील कासारखेडा, बेलकुंड आदी नूतन सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ यांनी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या भेटी घेतल्या. त्यांचा सत्कार केला. यावेळी बेलकुंडचे सोसायटीचे नूतन संचालक घाडगे यांच्यासह भगवान माकने, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.