लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बामणी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध झाली. चेअरमन बालाजी बंडापल्ले, व्हाईस चेअरमन विनोद गवरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १३ सदस्य संख्या असलेली बामणी सोसायटीची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीचे चेअरमन बालाजी बंडापल्ले, व्हाईस चेअरमन विनोद गवरे, संचालक श्यामाबाई चिते, महानंदाबाई बोरसूने, संग्राम चेवले, याकुब मुजावर, शिवाजी ताडमाडगे, नवनाथ जानवळकर, किशनराव ठाकुर, बालाजी देवकुळे, गोपाळ दिवटे, दिलीप बंडापल्ले, निवृत्ती माडे यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आशियाना निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या सर्व नुतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार केला. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव, श्रीकात ठाकुर, विपीन गवरे, शहाजी माडे, संभाजी ठाकुर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.