22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते महिंद्राच्या स्कार्पियो एन गाडीचे अनावरण

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते महिंद्राच्या स्कार्पियो एन गाडीचे अनावरण

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. ९ जुलै रोजी सायंकाळी लातूर शहरातील इंडोमोबील सेल्स अ‍ॅण्ड सर्विसेसमधील लातूरमध्ये पहिल्यांदाच आलेल्या महिंद्राच्या स्कार्पिओ एन या अत्याधुनिक चार चाकी गाडीचे केक कापून अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार देशमुख यांनी महिंद्राच्या स्कार्पिओ एन गाडीची पाहणी करुन संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.

आकर्षक रचना, अद्यावत फीचर्स, कमी किंमत, अधिक मायलेज यामुळे सदरील गाडी ग्राहकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी महापौर दीपक सूळ, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, दीशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत देशमुख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हाईस चेअरमन श्याम भोसले, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, आयुब मणियार, रत्नदीप अजनीकर, नागसेन कामेगावकर, बबन देशमुख, विकास वाघमारे, गोटू यादव, सूर्यकांत कातळे, प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह लातूर जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित, नागरिक, उद्योजक, व्यापारी अधिकारी उपस्थित होते. इंडोमोबील सेल्स अ‍ॅण्ड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ सत्यजित देशमुख यांनी याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. जनरल मॅनेजर सुप्रिया बिराजदार, सेल्स मॅनेजर पर्सनल महेश जाधव व इतर सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या