लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी लातूर शहरातील बी-४४ एमआयडीसी लातूर शहर कार्यालय येथे लातूर शहर महानगरपालीका फेरीवाला समिती शिष्टमंडळाने भेट घेऊन लातूर मनपाने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे व फेरीवाला निवडणूक संदर्भात चर्चा केली.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी फेरीवाल्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याची संबंधितांना सूचना केली. यावेळी लातूर शहर महानगरपालिका फेरीवाला समितीचे सदस्य तथा काँग्रेसचे कार्यकर्ते गौस गोलंदाज, शिवसेनेचे त्र्यंबक स्वामी, हणमंत पडवळ, साहेरा पठाण, मधुकर काळदाते, मज्जीद बागवान, बालाजी गिरी, खुदबुद्दिनबाबा शेख, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.