लातूर : प्रतिनिधी
लातूर येथे शिक्षण घेत असलेली उर्वी भाऊराव यादव सीबीएसई परीक्षेत ५०० पैकी ४९९ मार्कस घेऊन महाराष्ट्रातून प्रथम व भारतातून दुसरी आली आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन व कौतुक करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तीला शुभेच्छा दिल्या.
लातूर शहरातील वसंतराव नाईक चौक एलआयसी कॉलनी येथील डॉ. भाऊराव यादव यांच्या निवासस्थानी दि. २५ जुलै रोजी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन उर्वी यादव हिने मिळवीलेल्या धवल यशाचे कौतुक केले, तिचे व पालक आणि संस्थाचालकांचे कौतुक केले, अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. भाऊराव यादव यांच्यासोबत त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, माजी महापौर अॅड. दीपक सुळ, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, डॉ. स्नेहल भाऊराव यादव, प्रवीण घोटाळे, लातूर जिल्हा नियोजन समितीचे अॅड. सदस्य समद पटेल, सिकंदर पटेल, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, युनूस मोमीन, व्यंकटेश पुरी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.