लातूर : प्रतिनिधी
लातूर- दिनांक २६/०२/२०२३ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ५० वर्षानंतर स्नेह-मिलन येथील अंबाजागाई रोडवरील कार्निव्हल रिसॉर्ट येथे दि. २६ फेबु्रवारी रोजी उत्साहात व जल्लोषात पार पडले. या स्नेह-मिलन कार्यक्रमासाठी सबंध महाराष्ट्रातून ४७ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यातील बहुतांश माजी विद्यार्थी विद्यापीठात तसेच शासनातील अनेक उच्च पदांवर कार्यरत होते व सध्या निवृत्तीचे समाधानी जीवन जगत आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात आयोजकांतर्फे पुष्पगुच्छ व माजी विद्यार्थी प्रदीप चालुक्य यांच्यातर्फे दयानंद सरस्वती यांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आली. दरम्यान माजी विद्यार्थी कुमार ठोंबरे यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. यानंतर सर्वानी मनोगताच्या माध्यमातून आपापल्या कारकिर्दीचा आढावा मांडला व महाविद्यालयीन तसेच वसतिगृहातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. याचबरोबर यापुढे अशा प्रकारचे स्रेह-मिलन वारंवार आयोजित करण्याचा सर्वांनी मानस व्यक्त केला व पुढील भेटीसंदर्भात चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब कोरे, आबासाहेब चव्हाण, ज्ञानोबा फुलारी, डॉ. बापूराव माने, शिवानंद खंदारे, अशोक रेवडकर, श्याम हाके, गोंिवद मनाळे, प्रभाकर मुळे, एम. एम. शेख तसेच पुढील पिढीतील अमोल आबासाहेब चव्हाण व कुणाल बाबासाहेब कोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी व सिनेगायक उदय वायकर यांनी
केले.