23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeलातूरआरटीई प्रवेशासाठी चौथ्यांदा मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी चौथ्यांदा मुदतवाढ

एकमत ऑनलाईन

लातूर : आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दि. ११ जून पासून सुरूवात झाली आहे. लातूर जिल्हयातील १ हजार ७४० जागेसाठी १ हजार ६०४ बालकांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे. पहिल्या फेरीत आजपर्यंत १ हजार २१ बालकांचे इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मोफत प्रवेश झाले आहेत. ज्या पालकांच्या पाल्यांचे प्रवेश रखडले आहेत. त्याना प्रवेश घेण्यासाठी पालकांना दि. ३१ जुलै पर्यंत शिक्षण विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.

अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया होत आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे नोंदणी झालेल्या २३८ शाळांनी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. या नोंदणी झालेल्या २३८ शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील १ हजार ७४० जागेच्यासाठी ऑनलाईन पध्दतीने लॉटरी काढण्यात आली. लातूर जिल्हयातील १ हजार ६०४ बालकांना इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी निवड झाली आहे.

पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी दि. ११ जून पासून प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. प्रवेशासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ११ जुलै व त्यानंतर पुन्हा दि. २३ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली होती. तर आता दि. ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दे्ण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत १ हजार २१ बालकांचे इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मोफत प्रवेश झाले आहेत. उर्वरीत प्रवेशासाठी सहा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.

१०२१ जणांचा झाला प्रवेश
लातूर जिल्हयातील १ हजार ६०४ बालकांची आरटीईतंर्गत लॉटरी होऊन इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार २१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यात लातूर तालुक्यातील ९४५ विद्यार्थ्यां पैकी ५८६ जणांनी प्रवेश घेतला आहे. उदगीर तालुक्यातील २०५ बालकांपैकी १४८ प्रवेश, निलंगा तालुक्यातील १३५ बालकांपैकी ८७ प्रवेश, अहमदपूर तालुक्यातील ९७ बालकांपैकी ५८ प्रवेश, चाकूर तालुक्यातील ६८ बालकांपैकी ३७ प्रवेश, औसा तालुक्यातील ७६ बालकांपैकी ५३ प्रवेश, देवणी तालुक्यातील ३४ बालका पैंकी २७ प्रवेश, रेणापूर तालुक्यातील २७ बालकांपैकी २१ प्रवेश, जळकोट तालुक्यातील ५ बालकांपैकी ४ बालकांचा मोफत प्रवेश इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी झाला आहे. तर अपवाद शिरूर अनंतपाळ तालुक्याचा आहे. मोफत प्रवेशासाठी १२ बालकांना लॉटरी लागूनही आजपर्यंत एकाही बालकाचा प्रवेश निश्चित झाला नाही.

देवणी तालुक्यात सात-बारा संगणकीकरण पूर्णत्वाकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या