उदगीर (बबन कांबळे.) वातावरणामुळे होणा-या सर्दी आणि खोकला सहजतेने घेऊ नका, स्वत:ची काळजी घेऊन कुटुंब सुरक्षित ठेवा, तात्काळ उपचाराने व निदानाने रुग्ण लवकर बरे होतात. तालुक्यात विनामूल्य ३० कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. कोविड लसीकरणाने कोरोना आजारांपासून संरक्षण मिळते. तेव्हा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रशांत कापसे डॉ दताञाय पवार यांनी केले आहे.
तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत कापसे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वातावरणातील बदलत्या हवामानामुळे प्रत्येक घरात सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. सर्दी, खोकला आणि सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सहजतेने घेऊ नका, ती ओमीक्राँनची लक्षणेदेखील असू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरकडे जावे, तपासणी तसेच कोरोना चाचणी करावी. रिपोर्ट येईपर्यंत घरातदेखील मास्क लावून वावरावे, या सोबतच घरातील लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेमध्ये सौम्य ताप हे एक सामान्य लक्षण होते. त्यामुळे अनेक दिवस तापीची तक्रार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना चाचणी करून घ्यावी.
ओमीक्राँन या लाटेची लक्षणे बदलत चालली असून सर्दी, खोकला, डोकेदुखी ,डोळे दुखणेकिंवा सूज येणे, जळजळ होणे आणि डोळ्यातून पाणी येणे अशी कोणतेही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका, असे डॉ. प्रशांत कापसे म्हणाले, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, सँनिटायझरचा वापर करा, काही लक्षणे दिसून येतात स्वत:ला होमक्वारंटाइन करून आराम करा, दररोज दोन वेळा विक्स टाकून वाफ घ्या, मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, कोरोना, व्हायरसकिंवा ओमीक्राँनपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची प्रत्येकाने काळजी घेणे सर्वात महत्त्वाची आहे. या सोबतच नेहमी मास्क लावावा वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत शिवाय जर तुम्ही लस घेतली नसेल तर लगेच लस घ्या, लसीकरणाने तुम्ही स्वत:ला संसर्ग रोगापासून वाचू शकता अशी माहिती त्यांनी दिली.