24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरमोफत पुस्तकांचा विषय यंदा ‘ऑक्सिजन’ वर!

मोफत पुस्तकांचा विषय यंदा ‘ऑक्सिजन’ वर!

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मोफत दिली जातात. परंतू, यंदा मोफत पुस्तकांचा विषय ‘ऑक्सिजन!’ आहे, अशी एकंदर परिस्थिती आहे. कारण अद्याप बालभारतीचे पु्स्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही, असे विश्वासनिय सुत्रांकडून सांगण्यात आले. असे असले तरी लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मात्र पुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदविली आह.

राज्य शासनातर्फे सर्वशिक्ष अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून आवश्यक पुस्तकांची छपाई केली जाते. मात्र यंदा पुस्तक छपाईसाठी लागणा-या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत पुस्तकेच उपलब्ध होणार नाहीत. बालभारतीकडे गत वर्षीचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे.. तसेच उपलब्ध असलेला कागद वापरुन काही पुस्तकांची छपाई करण्यात आली. परंतु, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना पुरतील एवढ्या पुस्तकांची छपाई झालेली नाही, असे सांगण्यात येते.

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला. या ‘अभूतपूर्व’ संकटामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नूकसान झाले आणि होतही आहे. शालेय परिक्षांपासून ते स्पर्धा परिक्षांपर्यंत कोरोनाची झळ पोहोचली. शाळा बंद, वर्ग भरले नाहीत, जो काही अभ्यास झाला तो ऑनलाईन. त्यात कोरोनची दुसरी लाट आाली आणि चक्क परिक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळाला घ्यावा लागला. एकंदर शिक्षण क्षेत्राची ही परिस्थिती असताना सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मिळणा-या मोफत पुस्तकांचा विषय खूप मागे पडला आहे. दरवर्षीच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे यंदा १५ जूनला शााळा सुरु होतील की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्या अनुषंगीक कामांना गती आलेली नाही. मोफत पुस्तके, मोफत गणवेशाचे काय होईल, हे सांगणे आजतरी शक्य नाही.

तीन लाख पुस्तकांची मागणी नोंदविली
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बालभारतीकडे मराठी व उर्दू माध्यमाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २ लाख ९१ हजार ५०६ पुस्तकांची नोंदणी केली आहे. त्यात मराठी माध्यमाच्या २ लाख ६२ हजार ५०४ तर उर्दू माध्यमाच्या २८ हजार ९१२ पुस्तकांचा समावेश आहे. या विभागाकडे शिल्लक आणि पुनर्रवापरच्या पुस्तकांचे काही संच उपलब्ध आहेत, अशी माहिती या विभागाच्या सुत्रांनी दिली.

देशी खा, ‘इम्युनिटी’ वाढवा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या