लातूर : प्रतिनिधी
नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होत त्याद्वारे जनसेवेचे कार्य करणा-या द्वारकादास शामकुमार वस्त्र दालन समूहाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिक भाविक-भक्तांसाठी शनिवार, दि. ९ जुलै रोजी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तरी यामध्ये सहभागी होण्यासाठी भाविक-भक्तांनी द्वारकादास शामकुमारच्या लातूर, उदगीर, अहमदपूर, अंबाजोगाई येथील शाखेत लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठुरायांच्या दर्शनाला महाराष्ट्रासह देशभरातून भाविक-भक्त मोठ्या संख्येने दाखल होत असतात. यामध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला मोठे महत्त्व आहे. या वारींबद्दल प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. दूरवरुन वारकरी पायी चालत पंढरपूरात दाखल होत असतात. दरम्यान, रविवार, दि. १० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, तरी राज्यातील प्रसिद्ध आणि नामांकित वस्त्र दालन असलेल्या आणि विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होणा-या द्वारकादास शामकुमार वस्त्र दालन समूहाच्या प्रत्येक शाखेतून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठुरायाचे दर्शन मिळावे यासाठी ज्येष्ठ नागरिक भाविक-भक्तांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, दि. ९ जुलै रोजी बस प्रस्थान करणार असून जे भाविक-भक्त सहभागी होणार आहेत त्यांनी नोंदणी केल्यानंतर सांगितलेल्या वेळेत, द्वारकादास शामकुमारच्या त्या-त्या शाखेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नुकत्याच साज-या करण्यात आलेल्या राष्ट्रीय डॉक्टर्स-डे निमित्त द्वारकादास शामकुमाराच्या वतीने अविरतपणे रुग्ण सेवा करणा-या सेवाभावी डॉक्टरांचा त्यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तरी द्वारकादास शामकुमाराच्या वतीने आयोजित आषाढी एकादशीनिमित्त बससेवेसाठी इच्छुक भाविक-भक्तांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी करावी नोंदणी
आषाढी यात्रेनिमित्त आयोजित बससेवेत सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक भाविकांनी द्वारकादास शामकुमाराच्या नाथनगर कॉम्प्लेक्स, शेजारी कापड लाईन, लातूर (९५०३१०९४११) एस. पी. ऑफिसनजीक अंबाजोगाई रोड लातूर (९५०३१०९४२१) एम. जी. कॉलेज रोड, अहमदपूर (९५०३१०९४२१) लालबहादूर शाळेशेजारी, देगलूर रोड उदगीर (८४११९६११५४) आणि तथागत चौक, अंबाजोगाई (९५४५९८९८४६) या शाखेत किंवा दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.