23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeलातूरवलांडीच्या विश्रामगृहामध्ये मद्यपी, जुगारींचा मुक्तसंचार

वलांडीच्या विश्रामगृहामध्ये मद्यपी, जुगारींचा मुक्तसंचार

एकमत ऑनलाईन

देवणी (अन्वरखाँ पठाण) : देवणी तालुक्यात एकमेव असलेल्या वलांडी येथील शासकीय विश्रामगृहाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशिर्वादाने आंबट शौकीन, मद्यपी व जुगारींचा मुक्त संचार वाढल्याने शासकीय विश्रामगृहाचे तीनतेरा झाले आहेत.

वलांडीचे भुमिपुत्र तथा तत्कालीन आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या प्रयत्नातून प्रमुख अतिथी व अधिकारी यांच्या सेवेसाठी व सोयीसाठी देवणी तालुक्यातील निलंगा-उदगीर राज्य मार्गावर वलांडी येथे शासकीय विश्रामगृहाचे लाखो रुपये खर्च करून ३० वर्षापूर्वी भव्यदिव्य अशी सर्व सोयीसुविधासह इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारीही सेवानिवृत्त झाले. त्यामुळे इमारतीची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली. सध्या या इमारतीच्या परिसरात झाडे झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे जनावरांसह, आंबट शौकीन, मद्यपी, जुगारींचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच परिसरातील काही नागरिक इमारतीच्या सरंक्षण भिंत मधील परिसरात शौचास जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे.

विशेष म्हणजे, काही मद्यपी या विश्रामगृहाचा आधार घेत आहेत. त्यामुळे विश्रामगृहा बरोबरच परिसरात बाटल्यांचा खच पडल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय काही विघ्नसंतोषींनी इमारतीतील दारे, खिडक्या, टेबल, फर्निचर, खुर्चीची मोडतोड केल्याने अस्ताव्यस्त पडले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या