26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरतब्बल २५ ट्रव्हल्सद्वारे मोफत पंढरपूर वारीचा लातूर पॅटर्न

तब्बल २५ ट्रव्हल्सद्वारे मोफत पंढरपूर वारीचा लातूर पॅटर्न

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
माझं लातूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी एकादशीनिमित्ताने मोफत पंढरपूर वारीचा उपक्रम राबविण्यात आला. ११४७ भाविक प्रवाशी, ६० स्वयंसेवक, २ रुग्णवाहिका आणि विक्रमी २५ ट्रॅव्हल्सने १२०७ जण पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. माझ लातूर परिवाराचा हा २५ ट्रव्हल्सद्वारे मोफत पंढरपूर वारीचा लातूर पॅटर्न निर्माण केला.

याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह माझं लातूर परिवाराचे डॉ. सदानंद कांबळे, आदित्य भुतडा, शाम तोष्णीवाल, उपक्रमास बिनशर्त सहकार्य करणारे सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ, मास्क आणि सॅनिटायझरची सोय मोफत करण्यात आली.

या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, मदन केंद्रे, प्रविण पाटील, वाजीद शेख, नरेश घंटे, योगेश शिंदे, सतिश तांदळे, अभय मिरजकर, काशिनाथ बळवंते, डॉ. सीतम सोनवणे, तम्मा पावले, प्रमोद गुडे, संजय स्वामी, अ‍ॅड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दीपरत्न निलंगेकर, अ‍ॅड. राहुल मातोळकर, गोविंद हेड्डा, गणेश हेड्डा, अभिजित पिचारे, मच्छिंद्र आमले, विनोद कांबळे, सचिन अंकुलगे, सचिन सोळुंके, प्रा. अजय वाघमारे, भास्कर कुंभार, विष्णू साबदे, सुनिल गवळी, रत्नाकर निलंगेकर, राम साळुंके, एस. आर. काळे, उमेश कांबळे, अमर करकरे परिश्रम घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या