लातूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच दर्शनासाठी मोफत पंढरपूर यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज दि. ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील मध्यवर्ती बसस्थानकातून मोफत एस. टी. बसेस पंढरपूरला रवाना होणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते वारक-यांचा सन्मान करुन वारीसाठी वारक-यांना रवाना करण्यात येणार आहे.
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश राठी, श्री किशन सोमाणी विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, बन्सल क्लासेसचे अध्यक्ष चंदुसेठ बियाणी, सुरेश रिणुवा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाविकांनी या मोफत पंढरपूर यात्रेचा लाभ घ्यवा, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारिख, सचिव चंदुसेठ लड्डा, रमेश भूतडा, दत्ता लोखंडे, शाम मुंदडा, ओमप्रकाश मुंदडा, जुगलकिशोर झंवर, द्वारकादास मंत्री, बालाजी बारबोले यांच्यासह पदाधिका-यांनी केले.