31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूर३० टक्के दर कपातीचे आश्वासन पूर्ण करा

३० टक्के दर कपातीचे आश्वासन पूर्ण करा

उदगीर 'आप'च्यावतीने मुख्यमंत्री, उर्जामंत्र्यांना निवेदन

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्यातील नागरिकांचे कोविड कालावधीदरम्यान चार महिन्यांच्या २०० युनिट पर्यंत विजबिल माफी व वीज दरवाढ मागे घेवून ३० टक्के दर कपातीचे आश्वासन पूर्ण करा अशी मागणी आम आदमी पक्ष, उदगीरच्या वतीने महावितरण विभागीय कार्यालय उदगीरकडे दिलेल्या निवेदनात राज्याचे मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

या निवेदनात कळविण्यात आले आहे की, राज्यातील जनतेची कोविड संकट काळात परिस्थिती बिकट झाली आहे. तरी वाढीव दराने वीजेची देयके देण्यात आले आहे. तरी ते रद्द करून राज्यातील नागरिकांचे कोविड कालावधीदरम्यान चार महिन्यांच्या २०० युनिट पर्यंत विजबिल माफीचे आश्वासन दिले होते परंतु याविषयी अद्यापर्यंत कोणताही निर्णय झाला नाही तरी याविषयी आम आदमी पक्षाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले असल्याचे या निवेदनात कळविण्यात आले आहे.

त्याचबरोबर विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोविड कालावधीदरम्यान मार्च ते जून या चार महिन्यांच्या २०० युनिट पर्यंत विजबिल माफी करण्यात यावे, महावितरणकडून १ एप्रिलपासून करण्यात आलेली वीज दरवाढ मागे घ्यावी, शिवसेना जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिटपर्यंत ३० टक्के स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, राज्य सराकारच्या १६ टक्के अधिवार व वहन कर रद्द करण्यात यावा, वीज वंâपन्यांचे सीएजी ऑडिट करण्यात यावे, कोविड दरम्यानचे भरमसाठ दिलेले विजबिल मागे घेवून जून्या दराने मागील वर्षाप्रमाणे महिनेवारी देयक द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यानिवेदनावर जयश्री तोंडारे, सय्यद सैदोद्दिन, अजिंक्य शिंदे, आनंदा कामगुुंडा, अमित पांडे, शाम माने, शेख मोसिन, एम.शेख, शेख सलमान, वस्ताद, व्ही.के. अंबेसंगे, माणिक कसबे, जे.कि.पटले, शेख अन्सार, हाश्मी सय्यद, आशाबाई कांबळे, कौशाबाई कांबळे, छायाबाई कांबळे, कमलबाई पांढरे, मुक्ताबाई काळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

तिबेटमध्ये गोळीबारीचा सराव सुरू; भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या