31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरकोविड योद्ध्यांना सेवेत पूर्णपणे सामावून घ्या

कोविड योद्ध्यांना सेवेत पूर्णपणे सामावून घ्या

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा येथील कोविड योध्यांना पूर्णपणे सेवेत सामावून घ्यावे या मागणीचे निवेदन संबधिताकडून वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा पालकमंत्री विलासराव देशमुख यांना देण्यात आले. पालकमंत्री देशमुख हे विश्रामगृह येथे आले होते.

कोरोना (कोविड -१९) या महामारीच्या काळात जे कोरोना योद्धा म्हणून जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत त्यांना पूर्ण वेळ सेवेत सामावून घ्यावे. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, औषधनिर्माता, परिचारक, परिचारिका, कक्षसेवक म्हणून कंत्राटी तत्वावर काम करीत आहेत. या काळात काम करीत असताना जीव धोक्यात घालून, परिवाराचा विचार न करता, सेवा करीत आहोत.

तेव्हा आम्ही केलेल्या रुग्णसेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून कोविड योद्याना पूर्णपणे सेवेत समावेश करावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर डॉ. रत्नप्रभा गणेश, डॉ.सचिन अभंगे, रामदास सोमवंशी, मदार अलगुडे , विजय चव्हाण, प्रिती लोंढे, पेरमेश्वर श्रीमंगले,गोपाळ जाधव, विजय घाडगे, मायादेवी पवार, मीना ढगे, पुथ्वी श्रीमंगले, स्वामी योगेश, मुजीब नासरजंग, स्वामी प्रतीक्षा, माने आशिष, भोसले सुमित, सुरवसे संकेत, अविनाश जाधव, सुमित आपेट, इरफान शेख आदी जणांच्या स्वाक्ष-या आहेत.

पाटोदा येथील शेतक-याचा ऊस व साहित्य जाळले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या