22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरअडीच वर्षांत लातूर जिल्ह्यासाठी आणला ५२१९.२७ कोटींचा निधी

अडीच वर्षांत लातूर जिल्ह्यासाठी आणला ५२१९.२७ कोटींचा निधी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांत जबाबदारी आणि उपलब्ध कार्यकाळात राज्याच्या व लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी जितकी कामे करता येत होती ती सर्व कामे मंत्रीपदाच्या शेवटच्या दिवसापर्यंत केली. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांत लातूर जिल्ह्यासाठी ५२१९.२७ कोटी रुपयांचा विकास निधी आणता आला, अशी माहिती राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे आणि त्या अनुषंगाने मंत्री म्हणून राज्यासाठी व लातूर जिल्ह्यासाठी केलेल्या विकासात्मक कामांची माहिती देताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. पत्रकार परिषदेस लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, लातूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपातील विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभय साळूंके, लातूर तालुका काँगे्रसचे अध्यक्ष सूभाष घोडके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस मिडीया सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी, रविशंकर जाधव, प्राचार्य एकनाथ पाटील, प्रा. प्रविण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर चारच महिन्यात कोरोना महामारीचे जागतीक संकट सामोरे आले. कोरोना विरुद्धचे युध्द जिंकण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने महतवपूर्ण कामगिरी बजावली. त्याकाळी राज्याम फक्त ३ प्रयोशाळा होत्या. या संदर्भाने तातडीने निर्णय घेऊन या प्रयोगशाळेची १००० पर्यंत वाढवली. फक्त वैद्यकीय महाविदयालयाच्या माध्यमातून ६ कोटी लोकांची तपासणी केली. लाखो लोकांवर उपचार केले. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी २० समर्पीतरुग्णालयांची उभारणी केली. कोविड-१९ पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी त्वरित बेड उपलब्ध करुन देणे, चाचण्यांचे दर निश्चित करणे, आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ  राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला. कोवीड रुग्णावर उपचार करतांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्या नंतर ४० लिक्वीड मेडीकल प्लॅटसह अतिरीक्त ४० पीएसए प्लॅन्टची तातडीनी उभारणी केली. जवळपास ८ हजार ऑक्सिजनचे तर ३ हजार व्हेन्टिलेटरचे बेड निर्माण केले. कोवीड प्रादूर्भावाच्या दुस-या लाटे दरम्यान म्युकर मायकोसीसचे नवे संकट उभे टाकले होते. त्याचा सामना करण्यासाठी वैदयकीय महाविद्यालयाने महत्वपूर्ण योगदान दिले. ३ हजार म्युकर मायकोसिस रुग्णांवर उपचार केले त्यापैकी २५०० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.

आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार, कोरोना प्रार्दुभावात सर्व शासकिय व खाजगी रुग्णालयांना मनुष्यबळ पुरविले, सर्व वैद्यकिय महाविद्यालयात कोरोना उपचारासाठी शिशू उपचार कक्ष स्थापन केली. राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये प्रोजेक्ट प्लाटीना प्रकल्पासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, साधनसामग्रीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६.८५ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध दिला आणि प्लाज्मा डोनेशन बॅक सुरू केली. कोरोना महामारीचे संकट अधिक गंभीर बनले तेव्हा औषधाचा तसेच तपासणी कीटचा तुटवडा निर्माण झाला होता. प्रारंभी यावेळी जवळपास ४०० कोटी रुपयाच्या चाचणी किट व सर्जीकल बाबीच्या खरेदीला मान्यता देऊन खरेदी व पूरवठा सुरु केला. कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन हाफकीन मार्फत लस उत्पादन करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी १५४ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करुन दिले. जिल्हा तेथे वैद्यकिय महाविद्यालय, सिंधुदूर्ग येथे राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था स्थापन करण्याचा निर्णय, वैद्यकिय शिक्षण विभागास आयुक्त तसेच ३ सहसंचालक पदांची निर्मिती, अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी ८८८ पद निर्मितीला मंजुरी आदी निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी दृव्य विभागाच्या माध्यमातून घेतली.

सांस्कृतिक कार्य विभागाबद्दल बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, बदलत्या परिस्थीतीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एकूण राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा आढावा घेण्यात आला. या क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा घडवून आणून नवीन धोरण आखण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे आता सांस्कृतिक, लोककला, चित्रपट चित्रपटगृह या संबंधीचे नवीन स्वतंत्र धोरण ठरवण्यात येत असून हे सर्व काम आता अंतीम टप्यात आह. विभागचे वार्षीक बजट तीन पटीने वाढवून घेतले. राज्यभरातील कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात आले. कोरोना काळात राज्यातील ५६ हजार कलाकार व ८४७ कला समूहाना ३५ हजार कोटीची मदत केली. त्याच बरोबर कोरोना विषयक जनजागृतीसाठी कलाकारांची मदत व ५ कोटींची तरतूद केली. वेगवेगळया प्रकारच्या मालीका तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होणा-या कलाकाराबरोबर इतर व्यवसायीकांनाही आधार देण्यासाठी वेगवेगळया योजना राबवण्यात आल्या. रंगभूमी दिनी राज्यातील नाटयगृहे, सिनेमागृहे ५० टक्के आसनक्षमतेसह सुरु करण्यास मान्यता, ऐतिहासीक वारसा जतन आणि संवर्धनअंतर्गत गडकील्ल्यांचे जतन आणि संवर्धनसाठी सुकाणू समिती स्थापना केली. पहिल्या टप्यात शिवनेरी किल्ला,राजगड किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सुधागड किल्ला, तोरणा किल्ला जतन व संवर्धन कामास प्रशासकीय मान्यता १४.८९ कोटींची तरतूद केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनीमीकावा युध्द पध्दतीला जागतिक वारसा घोषीत करण्यासाठी भारतीय पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांनी प्रस्ताव सादर केला.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पाच वर्षानंतर घोषणा केली हा पुरस्कार गायीका आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना प्रदान, तमाशासमा्रज्ञी विठाबाई नारारयणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना, राज्य शासनाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभुमी जीवनगौरव पुरस्कार स्व. रत्नाकर मतकरी यांना प्रदान. सन २०१९-२० चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना देण्यात आला. कीर्तन पुरस्कारास कैकाडी महाराज, तमाशा पुरस्कारास नामचंद पवळा, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेस केशवराव भोसले यांचे नाव तर वृद्ध कलावंत मानधन योजनेस राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमधील कीर्तन व प्रबोधन या पुरस्कारास रामदास महाराज जाधव यांचे नाव देण्याचा निर्णय, सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्तींना ६ नवे पुरस्कार देण्याचा निर्णय कोकणातील सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील ८० गावांमध्ये विखुरलेल्या इतिहास पूर्वकालीन १००० कातळ शिल्पे संचालनालयामार्फत प्रकाशात आणली. या शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रागैतिहासीक काळातील कातळशिल्पाचे जागतिक वारसा घोषीत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. जागर संस्कृतीचा ऊत्सव कलेचा हा उपक्रम राबवला. राजपथावरील संचलनात महाराष्ट्रातील जैवविविधता व राज्यमानके दाखविणारा चित्ररथ सादर केला, या चित्ररथास लोकप्रियतेचा देशातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतीक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक. स्वातंत्र्या अमृत महोत्सव विविध उपक्रंमांनी साजरा करण्यासाठी राज्यशासना मार्फत ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी योजनेचा निर्णय, राज्य नाट्य स्पर्धा सुरु केल्या.

लातूर जिल्ह्याचे पालकत्व निभावले:
कोरोना महामारीच्या जागतिक संकटादरम्यान पालकमंत्री म्हणून लातूर जिल्ह्यातील नागरीकांचे विशेष काळजी घेतली. महामारीच्या काळात पहिल्या लाटेच्यावेळी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लातूरमध्ये थांबून नागरीकांना कोरोना उपचार व इतर सोयीसुवीधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन,पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून प्रत्येक नागरीकाला सोयीसुवीधासाठी सर्व यंत्रणात समन्वय राखला. लातूर कोविड-१९ मुक्त ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रभावी नियोजन केले त्यामुळे पहिल्या लाटेत लातूर जिल्हयाला फारसा त्रास झाला नाही. विलासरत्न विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर येथे अगोदरच बांधून तयार असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी ताब्यात घेऊन तेथे कोविड-१९ डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लातूर येथे तातडीने १० केएल क्षमतेचे २ व २० केएल क्षमतेचे २ ऑक्सिजन टॅक उभारले यामूळे हजारो रूग्णांचे प्राण वाचले. जिल्ह्यात जवळपास १४ शासकीय रूग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी व इतर सोयी-सुविधा तातडीने उभारण्याचा निर्णय घेतला. प्रारंभीच्या काळात लातूर आणि उदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळेची उभारणी केल.

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय महाविदयालय सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलसह अदययावत करण्यासाठी जवळपास २२१ कोटी रुपये खर्चून सुवीधा उभारल्या. लातूर येथे समाजकल्याण विभागाच्या सुसज्ज वसतिगृहे अधिग्रहित करुन त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु केले. या काळात अनेक निर्णय तातडीने घेतल्यामुळे कोविड-१९ रुग्णांवरील उपचार सुलभतेने होऊन मृत्यूचे प्रमाण कमी करता आले. लातूर येथील कोविड-१९ डेडिकेटेड रुग्णालय आणि कोविड-१९ केअर सेंटर येथे मिळालेल्या सोयी-सुविधांचे तर राज्यभर कौतुक झाले. जिल्ह्यातील २२ लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पुरविणे, शेतीमालाची वाहतूक आणि विक्री निर्धोकपणे होईल यासाठी त्यांनी बारकाईने लक्ष दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड-१९ ची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला कार्याललयातून फोन करुन त्याची विचारपूस करण्याचे काम दररोज सुरु होते. यात अडचण सांगणा-या रुग्णाला आवश्यक ती मदत तातडीने पोहोचविण्याची दक्षता घेतली.

मागच्या दोन्ही वर्षांत लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झाले या दोन्ही वर्षांत शेतकरी तसेच आपादग्रस्थांना धीर देण्यासाठी अधिकात अधिक निधी लातूर जिल्ह्यात खर्च केला. सन २०२०-२१ वर्षांत २५७ कोटी रुपये तर सन २०२१-२२ वर्षांत ४३६ कोटी रुपये मदत म्हणून जिल्ह्यात वितरीत केले आहे. एका बाजूला नैर्सगीक आपत्ती असतांनाही जिल्हयातील विकास प्रक्रीया चालूच ठेवली यात सार्वजनिक बांधाकाम, जलसंपदा, अनुसुचीत जाती व अदिवासी विकास योजना, तांडावस्ती सुधार, विजपूरवठा यंत्रणा यासह प्रमुख खात्यात अडीच वर्षांत जवळपास ५ हजार कोटीरुपयांचा निधी आणून तो जिल्ह्यात खर्च केला आहे.

लातूर जिल्ह्यासाठी सन २०१९ ते २०२२ या काळात प्रमुख विकास योजनावर ५ हजार कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी मंजूर करुन घेतला असून त्यातील बहूतांशी रक्कम खर्च झाली आहे. यात जिल्हा वार्षीक योजनेतून ७५४ कोटी, अनुसूचीत जाती जमाती विकास योजना ३७३ कोटी, सार्वजनीक बांधकाम विभाग जवळपास ८४६ कोटी, जलसंपदा विभागासाठी १७५१ कोटी, लातूर मनपासाठी जवळपास २३२ कोटी या प्रमुख योजनांचा समावेश आहे. लातूर शहरासाठी बाहयवळण रस्त्याला तत्वता मंजूरी मिळाली असून त्यावर जवळपास १ हजार कोटी खर्च होणार आहेत. लातूर जिल्हया रूग्णांलयासाठी १२० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला असून त्यासाठी कृषी महाविद्यालय जागेचे हस्तांतरण शेवटच्या टप्प्यात आहे. लातूर येथील विभागीय सारथी कार्यालयासाठी पदभरती मंजूर करून घेतली असून या कार्यालयामार्फत लातूरात वस्तीगृह, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधा उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन घेतली आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनेही गेल्या अडीच वर्षांत २३२ कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आल्याचेही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या