शिरूर अनंतपाळ : माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातून नगरपंचायत क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे या योजनांना मान्यता देण्यात आलेली असून या अंतर्गंत शहरातील विकास कामासाठी दोन कोटंींचा निधी मंजूर झाला असून या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. मायावती धुमाळे यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली.
याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. गणेश सलगरे, उपनगराध्यक्षा सौ. सुषमाताई मठपती, गटनेते संतोष शेटे, बांधकाम सभापती विरभद्र मुदाळे, पाणीपुरवठा सभापती उमाकांत देवंगरे, स्वच्छता सभापती चंद्रकलाबाई शिवणे, संदिप बिराजदार, ओमप्रकाश बरगे, बसवराज मठपती, गणेश धुमाळे, रतन शिवणे, दत्ता शिंदे आदी उपस्थित होते. शिरूर अनंतपाळ नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात असून राज्याचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासकामे पुर्ण झाली असून काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यात नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी आणखी दोन कोटंींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
या निधीतून शहरातील प्रभाग १० बापूरे घर ते संजय माने घर ते अरंिवंद चाळकेकर घर सिमेंट काँक्रीट करणे व नाली बांधकाम ३० लाख, प्रभाग ११ भागवत सावंत घर ते भीमाशंकर सलगरे घर सिमेंट काँक्रीट व नाली बांधकाम अनंत वाचवले ते नागनाथ घर ३० लाख,प्रभाग १२ दगडू पिटाळे घर ते प्रभाकर लव्हांडे घर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम ३० लाख,प्रभाग १६ पुजारी घर ते आबन शेख घर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम २५ लाख,अशोक नाबदे घर ते महादेव शिंदे घर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम १५ लाख, प्रभाग ७ मध्ये राम लोहार घर ते भानुदास तोरणे घर रस्ता व नाली बांधकाम २५ लाख, प्रभाग २ व्यंकट तुरे घर ते नामदेव जगताप घर सिमेंट काँक्रीट रस्ता २५ लाख, प्रभाग २ मध्ये गांधी चौक ते मारुती मंदिर सिमेंट काँक्रीट रस्ता व गटार बांधकाम २० लाख रुपये असे एकूण दोन कोटी रुपयांचा निधी या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी मंजूर झाला आहे.