27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरश्री केशवराज मंदिरतर्फे अंत्यविधी सहाय्य योजना

श्री केशवराज मंदिरतर्फे अंत्यविधी सहाय्य योजना

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील श्री केशवराज मंदिर ट्रस्टच्या वतीने समाजातील गोरगरिबांसाठी अंत्यविधी सहाय्य योजना सुरु करण्यात आल्याची माहिती श्री केशवराज देवस्थान ट्रस्टचे सचिव अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. शहरात बाराव्या शतकातील स्वयंभू श्री केशवराज देवस्थान आहे. अत्यंत जागृत देवस्थान अशी ख्याती पंचक्रोशीत असणा-या या मंदिर ट्रस्टच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मंदिर ट्रस्टच्या वतीने मागच्या १५ वर्षांपासून एक शववाहिका, शित शवपेटी व श्री सिद्धेश्वर स्मशानभूमी सेवाभावी वृत्तीने उपलब्ध करुन देण्याचे काम करीत आहे. शहरातील एखादी गरीब व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी त्या – त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी वर्गणी गोळा करुन अंत्यविधी उरकतात, किंवा मृताचे निकटवर्तीय, स्वाभिमानी मंडळी कर्ज काढून विधी पार पाडतात. म्हणजे एखादी व्यक्ती संपूर्ण आयुष्य कष्टात काढून आपली इहलोकीची यात्रा संपवताना त्याच्या अंत्यविधीसाठी घरच्यांना कर्ज काढावे लागणे ही बाब अत्यंत क्लेशदायी आहे.

अंत्यविधीसाठी गरजूंना कर्ज काढावे लागू नये, या उदात्त हेतूने केशवराज मंदिरच्या वतीने गरीब व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय देवस्थानने घेतला असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांनी
सांगितले. त्याचप्रमाणे देवस्थानची शववाहिकाही नि:शुल्क देण्यात येणार आहे. या योजनेसाठी मंदिर ट्रस्टला देणगी देऊ इच्छिणा-या देणगीदारांना त्यांनी देणगीरुपी दिलेली रक्कम पूर्णपणे आयकर मुक्त असणार आहे. इच्छुक देणगीदारांनी अधिक माहितीसाठी ९९२१६३५८८८ किंवा ८४०८८८८१३२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनही विश्वस्तांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या