23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरजी. के. इंटरनॅशनल स्कूलतर्फे एक हजार शिक्षकांचा सन्मान

जी. के. इंटरनॅशनल स्कूलतर्फे एक हजार शिक्षकांचा सन्मान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त उदगीर येथील जी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने उदगीर, जळकोट आणि देवणी या तालुक्यातील एक हजार शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस बसवराज पाटील, पी. जे. पाटील, अभंगराव कोयले, उदगीरचे युवा उद्योग उद्योजक रमेश अंबरखाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठता डॉ. रमेश दापके यांच्या उपस्थितीत एक हजार शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जी. के. इंटरनॅशनल स्कूलच्या एकुणच शैक्षणिक उपक्रमाबद्दल गौरोद्गार काढले.

प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार यांनी शाळा चालवणे शाळेच्या माध्यमातून दोन पैसे कमवणे हा उद्देश जरी समाजाला दिसत असला तरी बदलत्या शैक्षणिक पद्धतीमध्ये जागतिक स्तरावर चाललेले शिक्षणातील बदल, विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर व सुरक्षित अशा भौतिक सुविधा पुरविण्याचे काम काळानुसार नवीन येत असलेल्या सीबीएससी बोर्डाच्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला पहावयास मिळत आहे. भविष्यात जो स्पर्धेत उतरेल, गुणवत्ता देईल तोच टिकेल. पालकांना पैसे देण्याचा प्रॉब्लेम नाही, तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यात गुणात्मक बदल व गुणवत्ता हवी आहे. म्हणूनच ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूरच्या माध्यमातून मागील दहा वर्षात स्वयं अध्ययन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवतात हा उपक्रम राबवून राज्याला दिशा देण्याचे काम करत असताना, आता माझी जन्मभूमी व कर्मभूमी उदगीर येथे जी. के. इंटरनॅशनल स्कूल उदगीरच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात सेल्फ लर्निंगचा पॅटर्न विकसित करण्यासाठी दोन केंद्र समाजासाठी समर्पित करत आहोत, असे सांगीतले.

या कार्यक्रमास सुयश बिरादार, सुजित बिरादार, रामेश्वर सगरे, प्राचार्य हरीश गौड, विठ्ठल सर व इतर सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी राहुल हाके, ज्ञानेश्वर भामरे, संतोष बिरादार, घोगरे, ज्योतीराम पवार, अनिता स्वामी, स्वप्नाली पाटील, रामेश्वरी कदम, आम्रपाली सर्वोदय, रेशमा मोहिते इत्यादींनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या