24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरजिल्हाभरात गणरायाचे उत्साहात आगमन

जिल्हाभरात गणरायाचे उत्साहात आगमन

एकमत ऑनलाईन

लातूर : एकमत टीम
कोरोना महामारीमुळे गत दोन वर्षांच्या कालावधीनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे निर्बंधमुक्त आगमन झाले.यामुळे गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची अतिषबाजी, ध्वनीक्षेपकाच्या तालावर ठेका धरीत गणेश मंडळांनी गणरायाचे जोरदार स्वागत करीत स्थापना केली. गणेश मूर्ती विके्रत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. भक्तांनी घरोघरी मूर्तीची स्थापना केली. रात्री प्रशासनाने दिलेल्या वेळेपर्यंत गणेशाची पूजा करुन स्थापना केली. गणपती बप्पा मोरया च्या जयघोषात तरुणांचा उत्साह उदंड दिसून आला या निमिताने मंडळांनी विविध उपक्रम राबविले.

देवणी तालुक्यात ३३ गावांत एक गाव गणपती
देवणी तालुक्यात कथा पोलीस ठाणेअंतर्गत ३३ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे तर देवणी शहरात २१ गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना उत्साहात सवाद्य केली. देवणी शहरात बाल गणेश मंडळ भारत जोडो गणेश मंडळ क्रांतिवीर गणेश व्यापारी गणेश मंडळ ओम गणेश मंडळ नवयुवकव्यापारी गणेश मंडळ, क्रांतिवीर गणेश मंडळ, वीर शेव गणेश मंडळ, बंजारा गणेश मंडळ, श्रीहरी गणेश मंडळ, अमर गणेश मंडळ, इच्छापूर्ती गणेश मंडळ, अहिल्यादेवी गणेश मंडळ, विद्यानगरीचा राजा गणेश मंडळ, जय हनुमान गणेश वाल्मिकी गणेश, स्वयंभू महादेव गणेश, जय भवानी गणेश, जय मल्हार गणेश, विष्णू गणेश स्वामी विवेकानंद गणेश, सक्सेस गणेश मंडळ, कार्तिकी गणेश मंडळ, बाप्पा गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ व श्री गणेश मंडळ, गंगाराम तांडा गणेश मंडळ आदी गणेश मंडळांनी शहरात श्री ची स्थापना केली आहे. तसेच वलांडी धनेगाव जवळगा, हेळंब, कवठाळा, विजयनगर, गुरनाळ, देवणी खुर्द, अचवला, हिस्सामनगर, गुरदाळ, अंबानगर नेकनाळ, अजनी, बोंबळी, बोळेगाव, एनकी आदी गावांत एक गाव गणपती उपक्रम राबविण्यात आला.

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत गणेश मूर्तीची स्थापना
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर ,कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रमुख पाहूणे म्हणून अन्न व औषध विभाग निरीक्षक रुद्रमंगळ पोंगळे व औषध विक्रेते जयप्रकाश रेड्डी हे होते. गणेश मूर्तीची स्थापना करून आरती करण्यात आली.
प्रस्ताविक शिवंिलग जेवळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, उपाध्यक्ष जयदेवी बावगे, कोषाध्यक्ष शिवंिलंग जेवळे, प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुम्रेला, शेख कादर डॉ.नितीन लोणीकर ,माधुरी बावगे तसेच राजीव गांधी पॉलिटेक्निक हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय, ज्ञानसागर विद्यालय हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव या महाविद्यालयातील, प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी तवदरकर,नाजनिन शेख, नेहा ब्राह्मणे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या