चाकूर : चाकूर येथील मंथन फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेल्या सरपंच चषकाचे मानकरी गणेश क्लब लातूर यांनी एक लाख रूपयाचे बक्षीस पटकावले आहे. चाकूर येथे मंथन फौउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेल्या सरपंच चषकाचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलगरवाडीचे सरपंच डॉ. गोंिवदराव माकणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष अरंिवंद बिराजदार, नितीन रेड्डी, अॅड. युवराज पाटील, शिवकुमार उस्तूर्गे, सुधाकर हेमनर, प्रशांत शेटे ,रामभाऊ कसबे, पपण कांबळे, मोहम्मद सय्यद उपस्थित होते.
सरपंच डॉ.गोंिवदराव माकणे यांच्या हस्ते अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्री गणेश क्रक्रिेट क्लब लातूर व रेनाई क्रिकेट क्लब रेणापूर या दोन संघातील खेळाडूची ओळख करून व टॉस करून अंतिम सामन्याला सुरुवात झाली. यात श्री गणेश क्लब लातूरने रेणापूर संघावर मात करून पहिले पारितोषक सरपंच डॉ.गोंिवदराव माकणे यांच्या तर्फे १ लाख २७ रुपयेचे श्री गणेश क्लब लातूर संघाने पटकावले तर, दुसरे पारितोषक लक्ष््मी इंजिनिअंिरग यांच्यातर्फे ठेवलेले रेनाई क्लब रेणापूर संघाने ५१ हजार ५ रुपये, तृतीय पारितोषिक राम भाऊ कसबे यांच्यातर्फे ठेवलेले पानंिचचोली संघाने ३१ हजार ९९१ रुपये, आणि चौथे पारितोषक अॅड युवराज पाटील यांच्यातर्फे ठेवलेले २१ हजार ३१ रुपये, श्री गणेश संघाने पटकावले तर मार्केट मंत्र चे वेदपाठक यांच्यातर्फे ठेवण्यात आलेल्या स्पोर्ट सायकल मालिकावीराचा पुरस्कार रेणापूर संघाचा आकाश आडे यांनी तर बेस्ट फलंदाज साठी आयडियल कोंिचग क्लासेस तर्फे फ्रिज चा पुरस्कार बालाजी मुंडे यांनी व बेस्ट गोलंदाज साठी मोहम्मद सय्यद यांच्यातर्फे मोबाईल विकी कलमे या खेळाडूंने पटकावले. केशव सावंत यांनी केले .यावेळी मंथन फौउंडेशन चे सर्व सदस्य व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.