27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूरलातूरचा महाराजा गणपतीच्या अध्यक्षपदी गणेश देशमुख

लातूरचा महाराजा गणपतीच्या अध्यक्षपदी गणेश देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूरचा महाराजा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने लातूरचा महाराजा गणपतीच्या अध्यक्षपदी गणेश एस. आर. देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत सुंदर पाटील कव्हेकर, विनोद खटके, उमाकांत होनराव, अतुल कदम, विनोद मुळे, महादेव मुळे, अनुप मलवाडे, विनोद मालू, कैलास पाटील, विजयकुमार धुमाळ, योगेश महाराज, राजेश फडकुले, अजय बोराडे पाटील, सतीश बिराजदार, पंडित कावळे, योगेश गिरवलकर, रवी सूर्यवंशी, संतोष सलगरे, सुपर्ण जगताप इत्यादी उपस्थित होते. लातूरचा महाराजा गणपती मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य या सर्वांनुमते गणेश एस. आर. देशमुख यांची लातूरचा महाराजा गणपती-२०२२ च्या अध्यक्षपदीनिवड करण्यात आली.

यावेळी लातूरचा महाराजा प्रतिष्ठानचे साईराज पवार (संस्थापक अध्यक्ष), राजेश लखादिवे (संस्थापक सचिव), रवी ओझा (संस्थापक उपाध्यक्ष), अभिजीत पाटील (सं.कोषाध्यक्ष), दीपक पाटील (कार्याध्यक्ष), रोहित गंजेवार (कार्याध्यक्ष), राहुल वाकडे (युवा संघटक), निरज पाटील, समीर मणियार, गणेश मुंगळे (सहकार्याध्यक्ष) आणि गणेशभक्त यांनी गणेश एस.आर. देशमुख यांचे अभिनंदन केले व यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत जल्लोषपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात भव्यदिव्य स्वरुपात व्हावा त्यासोबतच लातूरकरांच्या कायम आठवणीत राहावा, अशा पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करुया, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या