अहमदपूर : प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश हाके यांची सलग नव्यांदा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे काम पक्ष वाढीसाठी गणेश हाके हे निष्ठेने काम करीत असुन या पुढेही करावे. या केलेल्या कामाची पावती म्हणून परत नवव्यांदा भाजपाच्या प्रदेश प्रवक्ते पदी निवड भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी आमदार रमेश कराड, शैलेश लाहोटी हे उपस्थित होते. या निवडीबद्दल माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, दिलीपराव देशमुख, भारत चामे, माजी नगराध्यक्ष अशोकराव केंद्रे, र्त्र्यंबक गुट्टे, हनुमंत देवकते, ता.अध्यक्ष भाजपा शिवाजी बैनगिरे, बबलू पठाण, दत्तात्रय जमालपुरे, प्रताप पाटील, परमेश्वर पाटील तसेच अहमदपूर- चाकूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी गणेश हाके यांचे कौतुक केले.
भाजपा प्रदेश प्रवक्तेपदी गणेश हाके यांची नियुक्ती
एकमत ऑनलाईन