26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरगणेश लाडकरचे नृत्य ठरले स्रेहसंमेलनाचे आकर्षण

गणेश लाडकरचे नृत्य ठरले स्रेहसंमेलनाचे आकर्षण

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शहराल शिवनेरी महाविद्यालयाच्या स्रेहसंमेलनात बी एसी प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या गणेश लाडकर या विद्यार्थ्यांने ” नटरंग ” या चित्रपटातील ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा ‘ या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करीत रसिकांनी दाद मिळविली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने शिवनेरी महाविद्यालयाच्या वतीने स्रेहसंमेलन घेण्यात आले. त्यात नटरंग साकारून गणेश लाडकरने ग्रामीण भागातील कलाकारात देखील शहराच्या तोडीला प्रतिभा असल्याचे सिद्ध केले असून गणेशच्या या नृत्य अविष्काराने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्रेहसंमेलनात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात अनेक मुली व मुलांनी आपला सहभाग नोंदवित उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रेक्षक व परिक्षकांची मने ंिजकली.समारोपाला गणेश लाडकरला प्रमाणपत्र व बक्षीस देऊन प्राचार्य डॉ ओमप्रकाश जाधव यांनी सत्कार केला.

या प्रसंगी मंचावर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा शाम कांबळे, प्रा रुपेश अंधारे, प्रा मलिकार्जून वाकडे, डॉ अमोल इंगळे, डॉ जयश्री शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा विलास लुटे, प्रा मारोती गायकवाड,प्रा वर्षा खरोबे सामनगावे,डॉ धोंडीराम धुमाळे, प्रा संदीप वडनेरे, कु. रोहिणी कासले, फिरोज तांबोळी, श्रीकांत नागटिळक सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांंनी परिश्रम घेतले

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या