23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरविलासराव देशमुख युवा मंचतर्फे गणेश मंडळांचे जल्लोषात स्वागत

विलासराव देशमुख युवा मंचतर्फे गणेश मंडळांचे जल्लोषात स्वागत

एकमत ऑनलाईन

लातूर : कोणताही सण असो की, उत्सव तो सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याची लातूर शहराची उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा आहे. त्या परंपरेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला तो विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांच्या जल्लोषात स्वागताने.

राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावर गंजगोलाई येथे विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने भव्य असे स्वागत मंच उभारण्यात आले होते. प्रारंभी श्री गणरायाचे पुजन व विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ‘श्री’ विसर्जन मार्गावरुन मार्गस्थ होणा-या प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत विलासाराव देशमुख युवा मंचच्या मंचावरुन करण्यात आले. प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गणेश भक्तांमध्ये सहभागी होऊन त्यांचा सत्कार करुन त्यांचा उत्साह अधिक प्रमाणात वाढविण्यात विलासराव देशमुख युवा मंचने महत्वाची भूमिका बजावली. प्रत्येक गणेश मंडळाने आपले सजीव देखावे विलासराव देशमुख युवा मंचच्या स्वागत मंचासमोर सादर केल्याने उत्साहाला उधान आले होते.

या चैतन्यमय, आनंददायी उपक्रमात लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सागावे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अ‍ॅड. समद पटेल, माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, चंद्रकांत धायगुडे, महेश काळे, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील, पंडित कावळे, माजी नगरसेवक युनूस मोमीन, आसिफ बागवान, प्रा. प्रविण कांबळे, अ‍ॅड. उदय गवारे, सुलेखा कारेपूरकर, नामदेव इगे, अकबर माडजे, अभिजीत इगे, विष्णुदास धायगुडे, सत्यवान कांबळे, यशपाल कांबळे, राजू गवळी, रमेश सूर्यवंशी, करीम तांबोळी, अब्दुल्ला शेख, काशिनाथ वाघमारे, रविकुमार जाधव, रईस टाके, जमाल्लोद्दिन मणियार, आबु मणियार, पिराजी साठे, युनूस शेख, सुंदर पाटील कव्हेकर, असलम शेख, पवनकुमार गायकवाड, संजय सूरवसे यांच्यासह असंख्य मान्यवर सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या