27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home लातूर जागोजागी जळतोय कचरा

जागोजागी जळतोय कचरा

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरात ठिकठिकाणी कचरा जाळला जात असल्याने (विशेष म्हणजे रात्री गुपचुप पण जाणिवपूर्वक कोणीतरी कचरा पेटवतो) संपूर्ण रात्रभर आणि दिवसाही धराचे लोळ उठतात. त्यामुळे निर्माण होणा-या प्रदूषणाच्या समस्येची तड नेमकी लावायची कशी ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कच-यामध्ये केवळ झाडांचा पालापाचोळाच नाही तर प्लास्टिकचे कप, पिशव्याही जाळल्या जातात. परिणामी रात्रभर हवेचे प्रदुषण होत आहे.

लातूर शहर चोहोबाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाढले असून कच-याचे प्रमाणही वाढत असून त्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका कमी पडते आहे. अनेक ठिकाणी कचरा नियमित उचलला जात नाही. जागो जागी रस्त्यावर कच-याचे ढीग साठलेले दिसतात. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असणा-या यंत्रणेकडून ब-याच चुका होत आहेत. घंटागाडी वेळेवर नाही आली की नागरिक साठवलेला कचरा रस्त्यावर टाकतात. हवेने कचरा पसरुन परत दुकानासमोर येऊ नये म्हणून तो जाळला जातो. नागरिकांनी कचरा कचरा पेटीत टाकावा अगर घंटागाडीकडे द्यावा तो जाळणे टाळावे. मात्र तसे होताना दिसत नाही.

त्यामुळे शहरात जागोजागी कचरा जाळण्याचे प्रकार दिसून येत आहेत. निवासी इमारतींना ओला कचरा, झाडांची पाने यांचे खत करण्यासाठी लातूर महापालिका प्रोत्साहन देत आहे, ओला कचरा-सुका कचरा वेगळा करा म्हणून सांगते आहे. परंतु, महापालिकेच्या उद्यानातील, ग्रीन बेल्टमधील कच-यासाठी मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणते नियम लागू होतात, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. शहरात बाहेरुन येणा-यांची संख्या मोठी आहे. शहरात सर्व प्रकारची वाहने वाढल्याने येणारा धूर आणि वाढलेले प्रदूषण आहे ही एक मोठी समस्या आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष शहरातील जिल्हा क्रीडा संकुल, नाना-नानी पार्क, शहरातील विविध ग्रीनबेल्टमध्ये फिरायला जातात. सकाळची शुद्ध हवा मिळवण्यासाठी आलेल्या नागरिकांना रात्री जाळलेल्या कच-याचे प्रदूषण सहन करावे लागते. बहुतांश वेळा महापालिकेच्या सफाई विभागच्या कर्मचा-यांकडुन रस्ते झाडुन कचरा एकत्र गोळा केला जातो. महापालिकेच्या यंत्रणेने तो कचरा तात्काळ उचलून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षीत असताना कचरा उचलला जात नाही. परिणामी वा-याने तो कचरा परिसरातील दुकानांत जातो. रस्त्यावर पसरतो. ही कटकट नको म्हणुन दुकानदार सर्रास त्या कच-याची होळी करतात. ते उचलन नाहीत म्हणुन हे जाळतात, असा काहींसा प्रकार लातूर शहरात घडत आहे.

टेरेसवर जाळला जातोय कचरा
शहरात महापालिकेच्या मालकीचे अनेक व्यापारी संकुल आहेत. या व्यापारी संकुलात भाडेकरु विविध व्यवसाय करतात. दुकानातून जमा झालेला कचरा चक्क टेरेसवर नेऊन टाकला जातो. दररोजचा कचरा पडत असल्याने टेरेसवर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो मग वेळ बघुन (रात्रीचीच) हळूच कचरा पेटवला जातो. तो रात्रभर धुमसत राहातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना रात्रभर धराचा त्रास होतो. असा प्रकार गांधी मैदानमधील व्यापारी संकुलाच्या टेरेसवर सर्रास घडत असतो. या व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या कोप-यांत सुद्धा कचरा जाळला जातो.

शहरात ई-कच-याचा ज्वलंत प्रश्न
आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ई-कचरा. तातडीने तोडगा काडण्याची ही समस्या आहे. महापालिकेकडे सध्या ई-कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्थाच उपलब्ध नाही. पर्यावरण संवर्धन समितीचा तर पत्ताच नाही.

कचरा जाळणे गुन्हा, पण कारवाईच नाही
उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कठोर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, यासंबंधी कारवाई होत नसल्याने नागरिकच नव्हे तर मनपाच्या सफाई कर्मचा-यांनाही याची माहिती नाही. नागरिकच नव्हे तर सफाई कर्मचारीही जमा केलेला कचरा पेटवून देतात. अनेक ठिकाणी कित्येक तास आग धुमसत राहते. कचरा जाळणा-यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे अगर भविष्यात कचरा जाळू नयेत म्हणून कर्मचारी आणि नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कष्टही महापालिका किंवा प्रशासनाने घेतलेले नाहीत.

जिल्ह्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरु : जिल्हाधिकारी दिवेगावकर

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

शिरूर अनंतपाळ :- नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडी तर्फे दि. २४ नोव्हेंंबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस...

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

८२ टक्के शाळांतून १२.५ टक्के विद्यार्थी उपस्थित

लातूर : राज्य सरकारच्या आदेशानूसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा उपायांची अंमलबजवणी करुन दि. २३ नोव्हेंबर लातूर जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. आठ महिन्यांनंतर शाळेची घंटा...

रुमा बचत गटाच्या गोधडीची ‘अ‍ॅमेझॉन’वर भरारी

लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘उमेद’च्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथील रुमा हा बचत गट पारंपरिक हस्तकारी गोधडी बनविण्याचा व्यवसाय करते....

सात दिवसानंतर निघणार सौदा

लातूर : लातूर आडत बाजार गेल्या सात दिवसापासून हमालांच्या हमाली दर वाढीवरून बंद आहे. रविवारी झालेल्या बैठकीत आडत बाजार सुरू ठेवून वाटाघाटी करून हमालीच्या...

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

लातूर : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दिवाळी पहाट या सुरम्य अशा सुरेल अशा सांगीतिक मेजवानीला रसिक मुकणार की काय अशी भीती मनात होती. परंतु लातूर...

निलंग्यातील पोलिस कर्मचारी राजकुमार लोखंडे यांचे निधन

निलंगा : औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील तरुण पोलिस कर्मचारी आणि निलंगा येथील माळी गल्ली येथील रहिवासी राजकुमार शिवाजीराव लोखंडे (३३) यांचे शनिवार...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...