23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeलातूरलोणी-तोंडार रस्त्यावर कच-याचा खच

लोणी-तोंडार रस्त्यावर कच-याचा खच

एकमत ऑनलाईन

उदगीर: प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथे ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या ब्रिद वाक्यातून स्वच्छतेचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत तर दुसरीकडे गावपातळीवर लाखो रुपये खर्च करून कागदोपत्री स्वच्छतेचे नगारे वाजवले जात आहेत, आणि रस्त्याच्या कडेला मात्र कच-याचा खच जागोजागी दिसून आहे. लोणी, तोंडार ,कुमठा रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कच-याचा खच दिसून येत आहे.

लोणी गावातून उदगीर, लोणी तोंडार, कुमठा हेर, रोहिणा, उजळबं, मार्गे चाकूर तालुक्याला जोडलेला मार्ग आहे. या रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने व हजारो प्रवासी प्रवास करतात परंतु लोणी गावच्या हद्दीत तोंडारकडे जाणा-या रस्त्यावर गावातील नागरिकांनी घाण कचरा,शिळे अन्न, नालीचे घाण पाणी व त्याच रस्त्यावर लहान मुलांचा शौच त्यामुळे प्रवास करणा-या व पादचा-याचें आरोग्य धोक्यात येत आहे.

साधारण १८ फुटाचा रस्ता आहे परंतु आजतागायत या कच-यामुळे केवळ १०/१२ फुट रस्ता वापरात आहे व सध्यस्थितीत वातावरणातील बदलामुळे अनेक आजार वाढत आहे मात्र याकडे लोणी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष होत आहे तेव्हा स्वच्छतेचे नगारे कागदोपत्री न नाचवता प्रत्यक्षात स्वच्छता अभियान सुरू करावे, अशी मागणी तोंडार, कुमठा, हेर रोहिणा, उजळंब येथील नागरिकांतून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या