27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरवाढत्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याचे हाल

वाढत्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याचे हाल

एकमत ऑनलाईन

शकील देशमुख  शिरुर अनंतपाळ : कोरोनाच्या वाढत्या लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून सर्वसामान्याचे हाल बेहाल झाले आहे. जवळची रोकड केंव्हाच संपली, त्यात हाताला काम नसल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहेत. सध्या अन लॉक लॉकडाऊन असले तरी जनजीवन ठप्प असल्याने लघुउद्योजक शेतकरी , शेतमजूर अडचणीत सापडले असून दैनंदिन खर्चासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गेल्या चार पाच वर्षांपासून सततचा दुुष्काळ त्यात यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन हातचे गेले, तर रब्बीचे उत्पन्नात घट झाली.परिणामी शेतकरी अडचणीत सापडले.बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक तरूणांनी बँक, पतसंस्था तर प्रसंगी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले. दररोज जी रक्कम गोळा होईल त्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह, दैनंदिन खर्च करून कर्जाची रक्कम फेडण्याचे काम करीत असत.

पण सध्या कोरोनाच्या प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत.त्यात लॉकडाऊननंतर दुकान उघडले तरी दुकानाचे भाडे, वीजबील व परत कच्चे भांडवल उभा करण्यासाठी जवळ पैसा नसल्याने हे लघु व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडणार आहेत.कोरोनाच्या संचारबंदीने शेतमजुरांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काम मिळत नसल्याने शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही, त्यामुळे हाताला काम ही नसल्याने घर कसे चालवायचे व इतर दैनंदिन खर्च कसा चालवावा अशा द्विधा मनस्थितीत लघु उद्योजक शेतकरी, शेतमजूर सापडल्याने त्यांना शासनाने आर्थिक मदत देऊन या परिस्थितीतून सावरणे आवश्यक आहे.

शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा
कोरोना वायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊननंतर अनलॉक करण्यात आले. याचा परिणाम शहरासह ग्रामीण भागावर ही झाला आहे. लघु उद्योगासह कृषी क्षेत्राला व कृषी पुरक व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतक-यांना दुबार पेरणीचा फटका बसल्याने शेतकरी शेतमजूर लघु उद्योग व छोटे व्यवसायिकांसह त्यावर काम करणारे मजूर अडचणीत सापडले असल्यानेशेतक-यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे

Read More  जिल्हा बँकेच्या १५ शाखांत स्विकारले पीक विम्याचे ५६ हजार प्रस्ताव

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या